Nokia ने लाँच केलाय ट्रांसपरंट स्मार्टफोन?

स्मार्टफोन(smartphone) कंपनी Nokia त्यांचा पहिला ट्रांसपरंट स्मार्टफोन लाँच करणार आहे, अशी बातमी काही दिवसांपूर्वीच समोर आली होती. त्यामुळे सगळेजण अगदी आतुरतेने Nokia च्या ट्रांसपरंट स्मार्टफोनची वाट बघत होते. हा स्मार्टफोन कधी लाँच होणार, खरंच लाँच होणार का, त्याचे स्पेसिफिकेशन्स कसे असणार, कॅमेरा कसा असणार याबाबत कंपनीने अधिकृतपणे कोणतीही माहिती शेअर केली नाही.

कंपनीचा ट्रांसपरंट स्मार्टफोन(smartphone) खरंच लाँच केला जाणार आहे का, याबाबत देखील अद्याप कोणतीही अपडेट शेअर करण्यात आली नाही. मात्र, अशातच आता सोशल मीडियावर अनेक पोस्ट आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर Nokia ने पहिला ट्रांसपरंट स्मार्टफोन(smartphone) लाँच केला आहे, असं सांगितलं जात आहे. याशिवाय अनेकांनी या स्मार्टफोनचे फोटो आणि व्हिडीओ देखील शेअर केले आहेत. मात्र खरंच हा फोन Nokia ट्रांसपरंट स्मार्टफोन आहे का? खरं तर सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडीओने अनेकांचे होश उडवले आहेत. हा फोन खरंच लाँच करण्यात आला आहे का? त्याची विक्री कधी सुरु होणार? या स्मार्टफोनची किंमत काय असणार, असे अनेक प्रश्न युजर्स पोस्टवर विचारत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्ट आणि व्हिडीओमागील सत्य आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. Nokia ने अद्याप अधिकृतपणे कोणत्याही ट्रांसपरंट स्मार्टफोनच्या लाँचिंगची घोषणा केली नाही. कंपनीने अद्याप काहीही सांगितलं नाही, की फोन खरंच लाँच होणार आहे का आणि त्याची किंमत काय असणार. मग सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या स्मार्टफोनचं काय, असा प्रश्न आता अनेकांच्या मनात आला असेल.

मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर पोस्ट आणि व्हिडीओमध्ये जो फोन पाहायला मिळत आहे तो Nokia चा ट्रांसपरंट स्मार्टफोन नसून एक मेथाफोन आहे. अलीकडे सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता, या व्हिडीओमध्ये एक महिला ट्रान्सपेरंट फोनसारखी वस्तू हातात धरून स्क्रोल करताना दिसली. त्यामुळे अनेक युजर्सचा असा गैरसमज झाला की, हा नोकियाचा नवीन ट्रान्सपेरंट फोन आहे. पण असं नाही.

महिलेच्या हातात असलेली ट्रांसपरंट फोनसारखी वस्तूम्हणजे “मेथाफोन”, एक पारदर्शक ऍक्रेलिकचा तुकडा आहे. हा मेथाफोन खऱ्या फोनसारखा दिसतो पण त्यात कोणतीही इलेक्ट्रॉनिक यंत्रणा नाही. याशिवाय महिलेने व्हिडीओमध्ये असं सांगितलं आहे की, हा फोन तिच्या मित्राने बनवला आहे. फोनच्या व्यसनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि एक सोशल एक्सपेरिमेंट म्हणून हा फोन तयार करण्यात आला होता.

सोशल मीडियावरील दाव्यांचा आणि व्हायरल व्हिडीओचा विचार केला तर असं स्पष्ट होतं आहे की, टेक कंपनी Nokia ने अद्याप कोणताही ट्रांसपरंट स्मार्टफोन लाँच केला नाही किंवा अशा स्मार्टफोनच्या लाँचिंगबाबत अधिकृतपणे घोषणा देखील केली नाही.

हेही वाचा :