9 जणींसोबत संसाराचा डाव मांडला, 6 जणींसोबत एकत्र झोपण्यासाठी….

डीजे आणि एमएमए कोच असलेला ऑर्थर ओ उर्सो सोशल मीडियावर आणि खासकरुन इन्स्टाग्रामवर चर्चेचा विषय बनलाय. तो त्याच्या वैवाहिक जीवनाची सोशल मीडियावर नेहमी चर्चा होते. ऑर्थरने(model) 9 मुलींसोबत लग्न केलंय. त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, मला प्रत्येक पत्नीकडून मुल हवं आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या माहितीनुसार, ऑर्थर ओ उर्सोची स्टोरी 2021 मध्ये व्हायरल झाली होती. जेव्हा त्याने ‘celebrate free love’ साठी 9 महिलांशी लगीनगाठ बांधली होती. दरम्यान, त्यानंतर त्याच्या एका पत्नीने त्याला घटस्फोट मागितला होता.

ऑर्थरने(model) इन्स्टाग्रामवर त्याच्या सर्व पत्नींसोबतचे फोटो शेअर केले आहेत. दरम्यान, सध्या त्याच्या फिटनेसबाबतही सोशल मीडियावर चर्चा आहे. तो फिट राहाण्यासाठी रोज भरपूर अंडी खातो, अशी माहिती आहे. 2023 मध्ये ऑर्थर फार चर्चेत आला होता. ब्राझीलचा मॉडेल असलेला ऑर्थर ओ उर्सो त्यानंतर सध्या तो त्याच्या तंदरुस्तीमुळे चर्चेत आहे.
ऑर्थरने 2023 त्याच्या सहा पत्नींसोबत एकत्र झोपण्यासाठी 20 फुटांचा बेड खरेदी केला होता. या बेडची किंमत 81 लाख 54 हजार इतकी होती. 20 फुट लांबीच्या बेड खरेदी केल्यानंतर त्याने प्रतिक्रिया दि होती. वैवाहिक जीवन आणखी चांगले बनवण्यासाठी त्याने हे पाऊल उचलल्याचं तो म्हणाला होता. “अनेकदा मला सोफा किंवा माझ्याकडे असलेला डबल बेड शेअर करावा लागत होता. माझ्या पत्नींसाठी जागा मोकळी करण्यासाठी जमिनीवर झोपावे लागत होते. त्यामुळे मी हा बेड खरेदी केला.”
आर्थरने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर 20 फूट उंचीच्या बेडचे फोटो शेअर केले आणि लिहिले, “काही महिन्यांच्या नात्यातील अनुभवांनंतर, मी ते प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला जे अनेकांसाठी अशक्य होते. जगातील सर्वात मोठा बेड तयार!”
आर्थरने 9 मुलींशी लग्न केलं होतं. पण गेल्या वर्षी त्याने त्यापैकी चार बायकांनी घटस्फोट घेतलाय. त्याने अलीकडेच 51 वर्षीय ओलिंडा मारियाशी लग्न केले. तो आता 27 वर्षीय लुआना काझाकी, 21 वर्षीय एमिली सूझा, 24 वर्षीय व्हॅल्क्वेरिया सॅंटोस, 51 वर्षीय ओलिंडा मारिया, 23 वर्षीय डॅमियाना आणि 28 वर्षीय अमांडा अल्बुकर्क यांच्यासोबत वैवाहिक जीवन जगतोय. आर्थरने आधी म्हटले होते की त्याला त्याच्या सर्व बायकांसह एक मूल हवे आहे जेणेकरून त्यापैकी कोणीही “नाराज” होणार नाही.
हेही वाचा :
ओवर एक्टिंग की दुकान रश्मिका मंदानाचा तो व्हिडीओ पाहून चाहते भडक
घटस्फोटाच्या एक महिन्यातच युझवेंद्र चहल आणि आरजे महवेशचं नातं झालं कन्फर्म?
आनंदाची बातमी! आठवड्याच्या सुरुवातीलाच घसरल्या सोन्याच्या किमती