लोणावळ्याला कसं जायचं? राहण्या-खाण्याची सोय असते का? सविस्तर माहिती जाणून घेऊया

मान्सूनमध्ये अनेक ठिकाणं पाहण्याजोगी बनवतात आणि यातीलच एक लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध ठिकाण म्हणजे महाराष्ट्रातील(places) लोणावळा हिल स्टेशन! तुम्हीही यंदा लोणावळ्याला जाण्याचा प्लॅन करत असाल तर आधी ट्रॅव्हल गाईड जाणून घ्या.

सध्या पावसाळा ऋतू सुरु आहे, या ऋतूत अनेकांचा फिरायला जाण्याचा प्लॅन बनतो. या सीजनमध्ये अनेक ठिकाणांचे सौंदर्य बहारदार बनते ज्यामुळे बहरलेल्या सुंदर नैसर्गिक दृश्यांचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक हा काळ फिरण्यासाठी एक उत्तम काळ मानतात आणि मनसोक्त फिरतात.(places) देशात अनेक पर्यटक ठिकाणे आहेत जी मान्सूनमध्ये फिरण्यासाठी उत्तम मानली जातात आणि यातीलच एक लोकप्रिय ठिकाण म्हणजे लोणावळा हे ठिकाण! हे ठिकाण महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे जिथे दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात.

दरवर्षी देश-विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक या सुंदर हिल स्टेशनला भेट देण्यासाठी येतात. हिरवेगार पर्वत, धबधबे, ढगांनी झाकलेल्या दऱ्या असे मनमोहक आणि सुंदर दृश्य तुम्हाला इथे पाहता येऊ शकतं. नैसर्गिक सुंदरतेने भरलेल्या या ठिकाणी तुम्ही तुमचा सर्व ताण विसरून जाल. (places) आता लोणावळ्याला जायचं कसं, तिथे खाण्या-पिण्याची सोय असते का अशी लोणावळ्याची संपूर्ण ट्रॅव्हल गाइड आम्ही तुम्हाला या लेखात सांगणार आहोत.

लोणावळ्यात फिरण्यासाठीची ठिकाणे
लोणावळ्यामध्ये तुम्ही अनेक सुंदर स्पॉट्स कव्हर करू शकता. भूशी धरण, टायगर पॉइंट आणि लायन्स पॉइंट, कार्ला आणि भाजा गुहा, राजमाची किल्ला, लोणावळा तलाव आणि वलवन धरण, सनसेट पॉइंट आणि ड्यूक नोज ही येथील प्रमुख ठिकाणे आहेत ज्यांना भेट देऊन तुमची तुमची ट्रिप संस्मरणीय बनवू शकता.

फूड अँड ड्रिंक्स
खाण्यापिण्याच्या गोष्टींविषयी बोलणं केलं तर लोणावळ्यातील चिक्की जगप्रसिद्ध आहे. याशिवाय, सहलीदरम्यान तुम्ही भाजलेला मका, चहा-भजी आणि स्थानिक महाराष्ट्रीयन थाळी यांचा आस्वास घेऊ शकता.

राहण्याची सोय
लोणावळ्यात तुम्हाला बजेट फ्रेंडली हॉटेल्स, मिड-रेंज हॉटेल्स मिळतील ज्यांची किमान २००० ते ५००० रुपयांच्या दरम्यान असेल. येथे तुम्हाला जंगलात राहण्याचा अनुभव देखील मिळू शकतो. पावसाळ्यात आणि आठवड्याच्या शेवटी हॉटेल्सची ॲडव्हान्स बुकिंग करणे फायद्याचे ठरेल.

लोणावळ्याला कसे पोहोचायचे
लोणावळा मुंबई-पुणे महामार्गावर, मुंबईपासून ८९ किमी आणि पुण्यापासून ६४ किमी अंतरावर आहे. मुंबई आणि पुणे येथून नियमित बसेस उपलब्ध आहेत. एक खाजगी किंवा शेअरिंग टॅक्सी देखील भाड्याने करता येईल. मुंबईहून लोणावळा आणि खंडाळ्याला पोहोचण्यासाठी अंदाजे २ तास लागतात आणि प्रवास नवीन एक्स्प्रेसवेवर आहे. तसेच जर तुम्ही लोणावळ्याला विमानाने जाण्याचा विचार करत असाल तर जवळचे विमानतळ पुणे (६५ किमी) आणि मुंबई (९० किमी) आहेत.

हेही वाचा :