दारूसाठी पैसे दिले नाही, नवरा संतापला; शेतात अर्धनग्न करून विटेने मारहाण

उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. दारू(alcohol) पिण्यासाठी पैसे न मिळाल्याने पतीने पत्नीला अर्धनग्न करून शेतात बेदम मारहाण केली, ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. रामपूर पोलीस स्टेशन हद्दीतील कोटीगाव येथे ही घटना घडली असून, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

असे घडले भीषण कृत्य:
-गौतम बच्चन नावाच्या व्यक्तीला दारूचे(alcohol) व्यसन होते आणि तो नेहमी पत्नीवर अत्याचार करायचा.
-बुधवारी सकाळी पत्नी मंजू गहू कापणीसाठी शेतात गेली असता, तिचा पती तिथे पोहोचला आणि तिला दारूसाठी पैसे मागू लागला.
-मंजूने पैसे नसल्याचे सांगत घरी गेल्यावर देण्याचे सांगितले.
-यामुळे संतापलेल्या गौतमने तिला अर्धनग्न करून विटेने बेदम मारहाण केली, ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांचा तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मंजूचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. आरोपी गौतमला अटक करण्यात आली असून त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
अनाथ झालेली दोन चिमुकली मुले
या घटनेनंतर ७ वर्षांची अलका आणि ५ वर्षांचा निखिल या लहानग्यांनी आईला गमावले असून, या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या अमानुष घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, स्थानिकांनी आरोपीस कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा :
IPL मॅच दरम्यान विराट कोहलीच्या बोटांना दुखापत, RCB चं टेन्शन वाढलं
मद्यपान करून वाहन चालवल्यास थेट गुन्हा दाखल होणार
मोहम्मद शमी अडचणीत! हसीन जहाँने केले गंभीर आरोप