मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राजकीय(political updates) स्तरावर विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर आहेत, अशी जोरदार चर्चा गेले दोन दिवस सुरू होती. अखेर स्वतः जयंत पाटील यांनी याचा इन्कार केला. “मी अजून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे. ना मला कोणी भाजप नेत्याने प्रवेश करण्याबाबत विचारले आहे, ना मी त्यांना तशी विनंती केली. त्यामुळे याबद्दल वावड्या उठवणे थांबवा”, असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक मंगळवारी होणार आहे. या बैठकीत प्रदेशाध्यक्षपदाबाबत निर्णय होईल, असे पक्षाचे नेते, आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले. जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा शनिवारपासून सुरु होती. स्वतः जयंत पाटील यांनी ना याला दुजोरा दिला होता, ना याचा इन्कार केला. ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू होती.
अखेर जयंत पाटील यांना प्रसारमाध्यमांसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट करावी लागली. भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी कोणी मला विचारलेले नाही ना मी कुणाला विनंती केलेली आहे. मी आजही शरद पवार(political updates) यांच्या राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
शरद पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत प्रदेशाध्यक्षपदाबाबत निर्णय होईल असे या पदासाठी चर्चेत असलेल्या आ. शशिकांत शिंदे यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्षपदाबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही. अन्य काही लोकांप्रमाणे माझे नाव चर्चेत असेल. पण मंगळवारच्या बैठकीत निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले.
जयंत पाटील यांचे यापूर्वीचे सहकारी आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार (political updates)यांनीही राजीनाम्याच्या चर्चांवर भाष्य केलं होतं. ते म्हणाले होते की, ‘त्यांच्या पक्षात काय आहे, ते त्यावर बोलतील. जयंत पाटील सीनियर नेते आहेत. आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केलं आहे. त्यामुळे आमची ओळख आहे, संबंध आहेत.
राजकीय भूमिका वेगवेगळी हे जगजाहीर आहे. त्यांनी राजीनामा का दिला, हे आपल्याला विचारायचा अधिकार नाही. पण पुढच्या आठवड्यात भेटले, तर त्यांना कारण विचारू. अनेक वर्ष झाले, ते त्या पदावर आहेत. नव्याने संधी द्यायची असेल, म्हणून ते बाजूला झाले असतील”, असेही त्यांनी म्हटलं होतं.
हेही वाचा :