भारतीय महिला संघाने या प्रतिष्ठित स्पर्धेत प्रवेश केला – भारतीय संघाने चार सामन्यांमध्ये अपराजित राहून २४ गोल(scoring) केले आणि फक्त एक गोल गमावला. पात्रता फेरीतून एएफसी महिला आशियाई कप फुटबॉलसाठी तिकीट बुक करून इतिहास रचला.
भारतीय महिला फुटबाॅल : भारतीय महिला फुटबाॅल संघाला मिडीयामध्ये त्याचबरोबर वैयक्तिकरित्या फार कमी श्रेय दिले(scoring) जाते. आता भारतीय महिला फुटबाॅल संघाने कौतुकास्पद कामगिरी केली. ही कामगिरी करुन त्याची महिला फुटबाॅलच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असे केले आहे. थायलंडला पहिल्यांदाच हरवून, भारतीय महिला संघाने या प्रतिष्ठित स्पर्धेत प्रवेश केला – भारतीय संघाने चार सामन्यांमध्ये अपराजित राहून २४ गोल केले आणि फक्त एक गोल गमावला.
भारतीय मुलींनी पहिल्यांदाच पात्रता फेरीतून एएफसी महिला आशियाई कप फुटबॉलसाठी तिकीट बुक करून इतिहास(scoring) रचला. उत्तम फॉर्ममध्ये असलेल्या महिला संघाने शनिवारी ग्रुप बी मधील चौथ्या सामन्यात उच्च क्रमांकाच्या थायलंडला २-१ असे हरवून ही कामगिरी केली. हा भारताचा थायलंडवरील पहिलाच विजय आहे. जागतिक क्रमवारीत थायलंड ४६ व्या स्थानावर आहे आणि भारतापेक्षा २४ स्थानांनी वर आहे.
पुढील वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये आशिया कप होणार आहे. संगीता ही भारताच्या विजयाची नायिका होती. तिने प्रथम २९ व्या मिनिटाला भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर, ७४ व्या मिनिटाला तिने आपला आणि संघाचा दुसरा गोल करून भारतीय महिला फुटबॉलमध्ये आणखी एक सुवर्ण अध्याय जोडला.
थायलंडसाठी एकमेव गोल चाचवान रोडथोंगने ४७ व्या मिनिटाला केला. भारतीय संघ चारही सामने जिंकून आपल्या गटात अपराजित राहिला. या काळात संघाने २४ गोल केले आणि फक्त एकच गोल स्वीकारला. हा गोलही गेल्या सामन्यात झाला होता. भारतीय संघाने मंगोलियाचा १३-०, तिमोर लेस्टेचा ४-० आणि इराकचा ५-० असा पराभव केला.
भारतीय संघ २३ वर्षांनंतर या प्रतिष्ठित स्पर्धेत खेळणार आहे. संघाने शेवटचा २००३ मध्ये खंडातील प्रमुख स्पर्धेत भाग घेतला होता. तथापि, त्यावेळी कोणतेही पात्रता सामने नव्हते. संघाने २०२२ मध्ये यजमान म्हणून भाग घेतला होता परंतु संघात कोविड-१९ चे रुग्ण आढळल्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली.
हेही वाचा :