Kolhapur : काळी बाहुली अन् चिठ्ठीवर नाव, पुरुष आणि महिलेकडून दिवसाढवळ्या स्मशानभूमीत नग्न पूजा, कोल्हापुरात खळबळ

कोल्हापूर: पुरोगामी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या कोल्हापुरात जादुटोण्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. (progressive )कोल्हापुरातील उदगाव या गावातील स्मशानभूमीत भर दिवसा पुरुष आणि महिला नग्न अवस्थेत येऊन करणी व भानामती करत असल्याचे प्रकार झाले आहेत. अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणी रक्षा बाजूला करून काळी बाहुली, नारळ, नावाची चिठ्ठी लिहून ठेवण्यात आली असून या घटनेनंतर कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि गावकऱ्यांनी यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील उदगावच्या स्मशानभूमीत अघोरी कृत्य केल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून एका महिला आणि पुरुषाकडून भरदिवसा नग्न होऊन करणी, भानामतीचे प्रकार सुरू आहेत. जयसिंगपूर येथील एका वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर उदगाव वैकुंठधाम या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. (progressive )रक्षा विसर्जनाच्या दिवशी सर्व नातेवाईक वैकुंठधाम या ठिकाणी आले. मात्र अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणी रक्षा बाजूला करून काळी बाहुली, नारळ, नावाची चिठ्ठी लिहून भानामतीचा प्रकार केल्याचे समोर आले. यानंतर नातेवाईकांनी उदगाव ग्रामपंचायतकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली. यामध्ये महिला आणि पुरुषाकडून नग्न होऊन करणी, भानामतीचा प्रकार सुरू असल्याचे समोर आलं.

मात्र पुरुष आणि महिला वेगवेगळ्या वेळी स्मशानभूमित आल्याचे दिसून आले. अमावस्या, पौर्णिमा, शनिवार, बुधवार दिवशी भरदिवसा ही अघोरी पूजा होत असल्याचे समोर आलं. या प्रकारामुळे उदगाव आणि जयसिंगपूर परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आता उदगाव ग्रामपंचायतीकडून तातडीने उपाययोजना करण्यात येणार आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीत आजवर कधीच अंधश्रद्धेला स्थान मिळालं नाही. पण गेल्या काही वर्षात भोंदूगिरीचे अनेक प्रकार कोल्हापुरात घडत आहेत. (progressive )या भोंदूगिरीला कोल्हापुरातील अनेक सर्वसामान्य नागरिक बळी पडत आहेत. त्यामुळे या भोंदूगिरीवर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने ही करण्यात आली आहे.

हेही वाचा :