जिल्ह्यात आज मॉन्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने सर्वत्र पाणीच पाणी(strong) झाल्याचे पाहायला मिळाले. यंदा लवकरच हा पाऊस सुरू झाल्याने शेतीची कामे खोळंबून शेतकरी हवालदिल झाल्याचे दिसून आले. त्यामुळे रोहिणीचा पेरा चुकण्याची चिन्हे आहेत. पंचगंगेच्या पाणी पातळीतही वाढ झाल्याने राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी १४ फूट आठ इंचांवर पोहोचली. तसेच पावसाने राधानगरीत १५ जणांच्या घरे, शेडवरील पत्रे कोसळून सुमारे एक लाख ७० हजारांचे नुकसान झाले.

मुलीवर अत्याचार’; नात्याला काळिमा फसणारी घटना, आईची पोलिस ठाण्यात फिर्याद
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वळीव पावसानेही जोरदार हजेरी लावली. हा पाऊस थांबून शेतीच्या कामाला वाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती; परंतु जिल्ह्यात सर्वच ठिकाणी दमदार हजेरी लावून मॉन्सूनपूर्व पावसाने आपली झलक दाखविली. दिवसभर बरसणाऱ्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले. ओढे, नाले यासह सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत काहीअंशी वाढ झाली. गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे रोहिणीचा पेरा लांबण्याची चिन्हे आहेत. जेथे पाण्याची सुविधा आहे, तेथे अनेक शेतकरी मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात रोहिणी नक्षत्रावर पेरणी करून खरिपाची सुरुवात करतात.
तसेच भाताची धूळवाफ पेरणी करून पावसाळ्यातील पिकाचे नियोजन करतात; परंतु सतत पडणाऱ्या पावसाने शेतात पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचे दिसत आहे. यापूर्वी पावळ्याच्या आधीची शेतीची कामे करण्यास वेळ मिळायचा. त्यामुळे मशागतीसह पेरणीची सर्व कामे वेळेवर व्हायची;(strong)परंतु यंदा मान्सूनपूर्व पावसाने लवकरच हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतीकामाचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

जास्त प्रमाणात मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. आज मात्र सकाळपासून पावसाळी वातावरण होते. सकाळी १० नंतर पावसाचा जोर वाढला. तो दिवसभर कायम राहिला होता. काहीशी उघडीप देऊन पुन्हा पावसाची रिपरिप सुरू होत होती. या पावसाने शेतवडीत पाणी साचले आहे. उसाला हा पाऊस उपयुक्त असला तरी भाजीपाला पीक या पावसाला बळी पडण्याचा धोका आहे. खरीप पेरणीसाठी अद्याप बहुतांश क्षेत्र तयार झालेले नाही. आजच्या पावसाने जमिनीतील ओलावा लवकर कमी होणार नसल्याने पेरण्या लांबण्याची शक्यता आहे. मेच्या अखेरीस धूळवाफ पेरण्यांची धांदल उडायची; परंतु पावसामुळे जमीनच तयार नसल्याने या पेरण्याही ठप्प झाल्या आहेत. सोयाबीन पेरणी, टोकणणीसुद्धा लांबली आहे. शेतकऱ्यांना पेरणीची चिंता लागली आहे.
चंदगड : तालुक्यात आज सलग तिसऱ्या दिवशीही पावसाने दमदार हजेरी लावली. दुपारी एक वाजेपर्यंत सर्वत्र पावसाचा जोर होता. त्यानंतर काही काळ विश्रांती घेतली; (strong)मात्र आभाळ भरून आलेले होते. सायंकाळी उशिरापर्यंत रिपरीप सुरूच होती. पावसाची लय आणि गती मॉन्सूनसदृश होती. त्यामुळे पावसाळा सुरू झाल्याचा अनुभव येत होता. सलग कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.
आजरा आजऱ्यात आज दिवसभर मॉन्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला. उन्हाळी भुईमूग, मटकी पिकाला फटका बसला आहे. उन्हाळी भुईमूग काढणीवेळी पाऊस सुरू झाल्याने भुईमुगाला कोंब फुटू लागले आहेत. दैनंदिन व्यवहारावरही परिणाम झाला आहे. आज दिवसभर तर पावसाची संततधार सुरू होती. तालुक्यात जूनसारखे वातावरण तयार झाले होते. पावसाने शेती मशागतीची कामे ठप्प झाली आहेत. जमीन तयार करणे, बांधबंधिस्ती, सड गोळा करणे या कामाला वेग आला होता. आता या कामांना ब्रेक लागला आहे. पावसामुळे लग्न समारंभ व वास्तुशांतीचे मुहूर्त अडचणीत आले आहेत.
हेही वाचा :
असं काय केलं महापाप की गर्लफ्रेंडने धावत्या बाईकवरच तरुणाला चप्पलीने दिला चोप ; Video Viral
रोहित शर्मानंतर कसोटीत भारताचं नेतृत्व कोणाकडे? ‘या’ दिवशी होणार घोषणा
सिंधू नदीचा पाणी प्रश्न चिघळला, आंदोलनाला हिंसक वळण, गृहमंत्र्यांचं घर पेटवल