महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद निवडणूक: उपमहाराष्ट्र केसरी पै. अमृतमामा भोसले खजिनदार पदी बिनविरोध निवड

मुंबई : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत(Election) कुस्ती क्षेत्रातील मानाची आणि जबाबदारीची भूमिका असलेल्या खजिनदार पदावर उपमहाराष्ट्र केसरी पै. अमृतमामा भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

पै. भोसले यांनी आपल्या अथक मेहनतीने आणि कुस्ती क्षेत्रातील प्रदीर्घ योगदानातून संपूर्ण महाराष्ट्रात एक खास ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या निवडीमुळे कुस्ती प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कुस्ती क्षेत्रातील विकासासाठी आणि पारदर्शक आर्थिक व्यवहारासाठी त्यांचा अनुभव व नेतृत्व नक्कीच उपयुक्त ठरणार आहे(Election), असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

या निवडीबद्दल पै. भोसले यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, नव्या जबाबदारीतून ते कुस्तीगिरांच्या हितासाठी भरीव कार्य करतील, अशी अपेक्षा कुस्ती क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा :