भारतीय पदार्थांमध्ये रबडीचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं(loves) रबडी खायला खूप जास्त आवडते. रबडीचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. गोड आणि चविष्ट पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर बाजारातून विकत रबडी किंवा गुलाबजाम आणले जाते. मात्र नेहमीच विकतची रबडी खाण्यापेक्षा तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये रबडी बनवू शकता. आपल्यातील अनेकांना नेहमीच असे वाटते की रबडी बनवण्यासाठी जास्तीचा वेळ लागतो, तासनतास दूध गॅसवर आटवून घ्यावे. पण आज आम्ही तुम्हाला १० मिनिटांमध्ये झटपट रबडी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली रबडी चवीला अतिशय सुंदर लागते. पुरी किंवा चपातीसोबत तुम्ही हा पदार्थ खाऊ शकता. रबडी घट्ट होण्यासाठी त्यात दह्याचा वापर केला जातो. चला तर जाणून घेऊया घट्ट आणि रवाळ रबडी बनवण्याची सोपी रेसिपी.
संध्याकाळ होईल आणखीन मजेदार; घरी बनवा चवदार अन् थंडगार दहीवडा, (loves)खूप सोपी आहे रेसिपी
साहित्य:
दूध
ब्रेड
कंडेंस्ड मिल्क
बदाम
काजू
वेलची पावडर
साखर
खवा
जायफळ पावडर
पिस्ता
तूप
पिकलेलं केळ खायला आवडत नाही? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा केळीचे खमंग आप्प्पे, नोट करा रेसिपी
कृती:
रबडी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये दूध गरम करण्यासाठी ठेवा. रबडी बनवताना(loves) दुधामध्ये अजिबात पाणी टाकू नये.
मिक्सरच्या भांड्यात ब्रेड टाकून बारीक वाटून घ्या. ब्रेडच्या चुऱ्यामुळे रबडी अतिशय घट्ट आणि सुंदर होते.
दुधाला उकळी आल्यानंतर त्यात वाटीभर कंडेंस्ड मिल्क घालून सतत मिक्स करत राहा. यामुळे रबडी कढईला चिटकणार नाही.
दोन्ही पदार्थ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यात साखर घालून मिक्स करा. साखर पूर्णपणे वितळल्यानंतर त्यात वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालून मिक्स करा.
नंतर त्यात बारीक करून घेतलेली ब्रेडची पावडर घालून मिक्स करा.मिक्स करून झाल्यानंतर त्यात चमचाभर खवा टाका.
सगळ्यात शेवटी तयार केलेल्या घट्टसर रबडीमध्ये काजू, बदाम तुकडे घालून मिक्स करून घ्या.
तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली घट्टसर रबडी. हा पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.
हेही वाचा :
- या राशीची होणार पगारवाढ, या राशीचा वाढणार मानसन्मान, तुमचे आजचे राशिभविष्य काय सांगते ?
- कबड्डी दिनाच्या रौप्य महोत्सवात सोनेरी आठवणींना उजाळा ; राम घोडपेंना जीवनगौरव; विठ्ठल देवकाते, शकुंतला खटावकर, चंद्रकांत काटे यांचाही सन्मान
- सुपर कनेक्टिव्हीटी असणारे महाराष्ट्रातील एकमेव शहर ठरणार चौथी मुंबई; भारतातील 9 मोठे प्रोजेक्ट डायरेक्ट कनेक्ट होणार