मजुरीच्या पहिल्याच दिवशी लखपती; खाणीत सापडला तब्बल ४० लाखांचा हिरा

मध्यप्रदेशच्या मजूराचं नशीब एका रात्रीत पालटलंय. खाणीत कामाच्या पहिल्याच(overnight) दिवशी 40 लाखांचा हिरा सापडलाय. याबाबत पाहूया एक सविस्तर रिपोर्ट

रात्रीत नशीब उजळलं, मजूर झाला लखपती !
ही कहाणी आहे मध्यप्रदेश मधल्या एका आदिवासी मजूराची….. हिऱ्याच्या खाणीत काम करताना, एका (overnight) मजूराला तब्बल 40 लाखांचा हिरा सापडलाय… जगप्रसिद्ध पन्ना येथील कृष्णा कल्याणपूर पट्टीमधील उथळ खाणीतील ही घटना आहे.

हा अमूल्य हिरा 11 कॅरेट 95 सेंटचा आहे. विशेष म्हणजे खाणीत खोदकाम करण्याचा माधव नावाच्या मजूराचा पहिलाच दिवस होता. पहिल्याच दिवशी सापडलेल्या या किमती हिऱ्यामुळे या मजुराचं जीवनच पालटलंय.

हिऱ्याचा होणार लिलाव? मजुराला किती फायदा ?
खाणीतून हिरा सापडताच युवकाने पन्ना शहरात असलेल्या हिरा भांडारात आपल्याला गवसलेलं अमूल्य रत्न जमा केलंय.. (overnight) जवाहिराने या हिऱ्याची अंदाजे किंमत 40 लाख रुपये इतकी सांगितली आहे. कोळशाच्या खाणीत हिरा प्राथमिक स्वरूपात सापडल्यानंतर त्यावर अनेक प्रक्रिया होतात. अखेरीस या स्फटिकासारख्या दिसणाऱ्या हिऱ्याला पैलू पाडण्यात येतात. हे काम झाल्यानंतर बाजारात त्याचा लिलाव करण्यात येणार आहे. लिलावात मिळालेल्या रक्कमेतून 12.5% रॉयल्टी वजा करून उर्वरित सगळी रक्कम या मजूराला मिळणार आहे.

पन्नाच्या या हिरा खाणीने आजवर अनेकांचे नशीब उजळले आहे. या खाणीत अनेकांना अमुल्य हिरे गवसले आहेत. या खाणीत अनेकांनी आजवर आपले नशीब आजमावून पाहिलंय.. या खाणीने अनेकांनी स्वप्न दाखवलीयेत. आजही या खाणीत अनेकजण आपले नशीब शोधण्यासाठी मोठ्या हिमतीने खोदकाम करतात. यावरून हेच सिद्ध होते की, मेहनत करणाऱ्यांची हार होत नाही.

हेही वाचा :