‘Avatar Fire And Ash’ चे नवे पोस्टर प्रदर्शित, चित्रपटात नव्या खलनायकाची एन्ट्री;

‘अवतार’ हा हॉलिवूड चित्रपट(film) भारतातही खूप लोकप्रिय आहे आणि प्रेक्षक त्याच्या पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आतापर्यंत या फ्रँचायझीचे दोन भाग प्रदर्शित झाले आहेत आणि दोन्ही भाग प्रेक्षकांना आवडले आहेत आणि चित्रपटाने कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत.

आता तिसऱ्या भागाची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण निर्मात्यांनी ‘अवतार: फायर अँड ॲश’ चे नवीन पोस्टर रिलीज केले आहे. यासोबतच चित्रपटाबद्दल एक मोठी अपडेट देखील शेअर करण्यात आली आहे. ही माहिती काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

जेम्स कॅमेरॉनचा ‘अवतार: फायर अँड अ‍ॅश’ हा चित्रपट ‘पँडोराची कहाणी पुढे नेण्यासाठी सज्ज आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज केले आहे आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत एक मोठी अपडेट देखील दिली आहे. या पोस्टरसोबत निर्मात्यांनी चित्रपटाच्या नवीन खलनायकाची माहिती देखील दिली आहे.

चित्रपटाचे (film)नवीन पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी लिहिले आहे की, ‘अवतार: फायर अँड अ‍ॅशमध्ये वरंगला भेटा.’ याद्वारे निर्मात्यांनी असेही सांगितले आहे की चित्रपटाचा ट्रेलर २५ जुलै रोजी ‘द फॅन्टास्टिक फोर: फर्स्ट स्टेप्स’ प्रदर्शित होत असलेल्या चित्रपटासह थिएटरमध्ये दिसणार आहे. ‘अवतार: फायर अँड अ‍ॅश’ १९ डिसेंबर २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

नवीन खलनायक वरंगच्या एन्ट्रीमुळे प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल आणखी उत्सुकता निर्माण झाली आहे. वरंगची व्यक्तिरेखा अभिनेता उना चॅप्लिनने साकारली आहे. निर्मात्यांनी वरंगचे एक नवीन पोस्टर रिलीज केले आहे आणि त्याला मांगकवान कुळाचा किंवा अ‍ॅश पीपलचा नेता म्हणून वर्णन केले आहे. नावी ज्वालामुखीजवळील धोकादायक भागात राहतो. ज्यामुळे पेंडोराच्या वातावरणात एक नवीन रंग पाहायला मिळणार आहे. वरंगच्या व्यक्तिरेखेच्या एन्ट्रीमुळे चित्रपट आणखी मनोरंजक होईल अशी अपेक्षा आहे. तसेच या चित्रपटाची कधी आधीपेक्षा जास्त मनोरंजक असणार आहे.

एम्पायरशी अलिकडेच झालेल्या संभाषणात, चित्रपटाचे दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन म्हणाले की वरंग हे पात्र अडचणींना तोंड देणाऱ्यांचा नेता आहे. यामुळे ते आणखी कठोर दाखवण्यात आले आहे. ते त्यांच्यासाठी काहीही करेल, अगदी ज्या गोष्टी आपण वाईट मानतो त्या देखील हे पात्र करणार आहे. दिग्दर्शक म्हणाले की यावेळी आपल्याला या पलीकडे जायचे आहे की सर्व मानव वाईट आहेत, सर्व नावी चांगले आहेत.

हेही वाचा :