Nothing Phone 3 vs Samsung Galaxy S25 vs Google Pixel 9: कोणता प्लॅगशिप स्मार्टफोन तुमच्यासाठी ठरणार बेस्ट?

अलीकडेच अनेक टेक कंपन्यांनी त्यांचे नवीन आणि फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच केले आहेत. हे स्मार्टफोन (launched)कमाल फीचर्ससह लाँच करण्यात आले आहेत. अशाच काही स्मार्टफोनबाबत आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

2025 च्या पहिल्या सहामाहित Nothing, Samsung आणि Google या तिन्ही कंपन्यांनी त्यांचे दमदार प्लॅगशिप स्मार्टफोन बाजारात लाँच केले आहेत. यामध्ये Nothing Phone 3, Samsung Galaxy S25 आणि Google Pixel 9 यांचा समावेश आहे. पण अनेकजण गोंधळले आहेत, की कोणता स्मार्टफोन खरेदी करावा(launched) आणि कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे? आता आम्ही तुम्हाला तिन्ही स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमतीबद्दल सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही ठरवू शकता की कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतो.

डिझाईन आणि डिस्प्ले
Nothing Phone 3 मध्ये 6.67-इंच फ्लेक्सिबल AMOLED डिस्प्ले आहे, (launched)ज्यामध्ये अल्ट्रा-थिन 1.87mm बेजल्स, 120Hz एडेप्टिव रिफ्रेश रेट आणि HDR सपोर्ट देण्यात आला आहे. ब्राइटनेस 4500 निट्सपर्यंत सपोर्ट आहे आणि फोनमध्ये IP68 रेटिंगसह Gorilla Glass 7i सुरक्षा देण्यात आली आहे.

Samsung Galaxy S25 चा 6.2-इंच Dynamic AMOLED 2X डिस्प्ले देखील 120Hz एडेप्टिव रीफ्रेश रेट सपोर्टसह येतो, मात्र याची पीक ब्राइटनेस 2600 निट्सपर्यंतच सपोर्ट करते. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी Gorilla Glass Victus 2 देण्यात आला आहे आणिडिव्हाईस बिल्ड IP68 रेटेड आहे. Google Pixel 9 मध्ये 6.3-इंच LTPO OLED स्क्रीन आहे, 2700 निट्स पीक ब्राइटनेस आणि 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देखील आहे. स्क्रीनला Gorilla Glass Victus 2 ची सुरक्षा देण्यात आली आहे आणि बिल्डला IP68 रेट केलं आहे.

प्रोसेसर, रॅम आणि स्टोरेज
Nothing Phone 3 मध्ये Snapdragon 8s Gen 4 (Adreno 825) प्रोसेसर देण्यात आला आहे, ज्यामध्ये 8GB किंवा 16GB रॅम आणि 256GB किंवा 512GB स्टोरेज देण्यात आले आहे. यामध्ये Android 15 आधारित Nothing OS 3.5 आहे आणि कंपनीने लवकरच Android 16 अपडेट देण्याचे देखील वचन दिलं आहे.

Samsung Galaxy S25 मध्ये Snapdragon 8 Elite for Galaxy चिपसेट देण्यात आला आहे, ज्याला Adreno 830 GPU सह जोडण्यात आलं आहे. यामध्ये 12GB रॅम आणि 128 ते 512 GB UFS 4.0 स्टोरेज देण्यात आलं आहे, फोन Android 15-बेस्ड One UI 7 वर चालतो. Google Pixel 9 मध्ये Tensor G4 चिपसेट आहे, जो 12GB LPDDR5X रॅम आणि 128GB ते 1TB पर्यंत स्टोरेजसह उपलब्ध आहे. हा फोन Android 16 वर चालतो.

कॅमेरा सिस्टम
Nothing Phone 3 मध्ये ट्रिपल 50MP रियर कॅमेरा सेटअप आहे आणि फ्रंटला 50MP कॅमेरा देण्यात आला आहे, यामध्ये 8K रिकॉर्डिंग सपोर्ट आणि Glyph मॅट्रिक्स सारखे इनोवेशन देखील देण्यात आले आहे. Samsung Galaxy S25 मध्ये तीन रियर कॅमेरे आहेत, ज्यामध्ये 50MP वाइड मेन + 10MP 3x टेलीफोटो + 12MP अल्ट्रा-वाइड यांचा समावेश आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 12MP चा फ्रंट कॅमेरा आहे. हा 8K आणि 4K व्हिडीओ रिकॉर्डिंग सपोर्ट देखील आहे. Google Pixel 9 ची कॅमेरा सिस्टम 50MP मेन + 48MP अल्ट्रा-वाइड अशी आहे आणि यामध्ये 10.5MP चा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन 4K 60fps व्हिडीओ रिकॉर्डिंग करू शकतो.

बॅटरी आणि चार्जिंग
Nothing Phone 3 मध्ये 5,150 mAh बॅटरी आहे, जी 65W वायर्ड आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. Samsung Galaxy S25 मध्ये 4,000 mAh बॅटरी आहे, जी 25W वायर्ड, 15W वायरलेस आणि 4.5W रिवर्स वायरलेस चार्जिंग सपोर्ट आहे. याशिवाय हा फोन Qi2.1 वायरलेस चार्जिंगसाठी देखील सुसज्ज आहे. Google Pixel 9 मध्ये 4,700 mAh बॅटरी आहे, जी 27W वायर्ड चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंग सपोर्ट आहे.

हेही वाचा :