दहावीत फक्त ५७ टक्के, कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन घेण्यास नकार, मोठ्या जिद्दीने IAS झाला, वाचा आकाश कुल्हारी यांचा प्रवास

यूपीएससी परीक्षा पास करुन अनेकांना आयएएस आणि आयपीएस ऑफिसर व्हायचे असते. यूपीएससी परीक्षेचा (exam)अभ्यास करायचा म्हटल्यावर दिवसरात्र मेहनत करावी लागते. आयपीएस आकाश कुल्हारी यांनीदेखील खूप मेहनत घेतली आणि यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. आयपीएस आकाश कुल्हारी यांचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे.

आयपीएस आकाश कुल्हारी यांचा जन्म राजस्थानमधील बिकानेरचा आहे. ते शालेय अभ्यासात हुशार नव्हते. परंतु तुम्ही खूप मेहनत घेतली की तुम्हाला यश हे मिळतेच याचं उत्तम उदाहरण म्हणजे आकाश कुल्हारी हे आहेत. ते शाळेत असताना फार हुशार नव्हते. परंतु कितीही अडचणी आल्या तरीही त्यावर मात करता यायला हवी आणि (exam) आपले लक्ष्य साध्य करता यायला हवे.

आयपीएस आकाश कुल्हारी यांना १०वीत खूप कमी गुण होते. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण बीकानेर, राजस्थान येथे झाले. त्यांना १०वीत फक्त ५७ टक्के गुण होते. त्यामुळे ११वीत त्यांना प्रवेश देण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांचे अॅडमिशन केंद्रीय विद्यालय, बीकानेर येथे केले. यानंतर त्यांनी खूप मेहनत घेतली आणि १२वीच्या परीक्षेत ८५ टक्के गुण मिळवले.

केंद्रीय विद्यालयात त्यांच्या आयुष्याला नवीन वळण मिळाले असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी १२वीनंतर (exam) दुग्गल कॉलेजमधून बीए डिग्री प्राप्त केली. यानंतर त्यांनी दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातून एमए केले. त्यांनी एमफीलसाठी अॅडमिशन घेतले आणि सोबतच यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली.

उच्चशिक्षण घेऊनही गावची माती सुटेना, मावळचा तरूण करतोय कोंबडी पालनाचा व्यवसाय; महिन्याला लाखो रुपयांची कमाई
आकाश कुल्हारी हे २००६ च्या बॅचचे आयपीएस ऑफिसर आहेत. त्यांना यूपीएससीपरीक्षेत २७३ रँक प्राप्त झाली होती. त्यांनी अनेक तरुणांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. कितीही कमी गुण मिळाले तरीही तुम्ही हिम्मतीच्या जोरावर कोणतीही परीक्षा पास करु शकतात.

हेही वाचा :