यंदा सोन्याच्या दराने उच्चांक गाठत तब्बल 1 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमचा टप्पा पार केला होता.(opportunity) मात्र आता या झपाट्याने वाढलेल्या दरात तब्बल 10 टक्क्यांची घसरण झाली असून, 92,000 रुपयांपर्यंत भाव खाली आले आहेत. त्यामुळे लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना स्वस्तात सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किमतीत मोठी घट झाली आहे. एप्रिल महिन्यात जेथे सोन्याचा दर 3500 डॉलर्स प्रति औंस होता, तो आता 3140 डॉलर्स प्रति औंसवर आला आहे. या घसरणीचे मुख्य कारण म्हणजे सुरक्षित गुंतवणुकीची मागणी कमी होणे आणि जागतिक तणावांमध्ये झालेली घट.

सोन्याच्या घसरणीची प्रमुख कारणे :
- भारत-पाकिस्तान तणावात घट
12 मे 2025 रोजी दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी घोषित झाल्यानंतर प्रादेशिक तणाव कमी झाला आहे. यामुळे सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीतील रस कमी झाला आहे. - अमेरिकन बाँड उत्पन्नात वाढ
डॉलर मजबूत झाल्यामुळे आणि बाँडवरील(opportunity)व्याजदर 4.5% पेक्षा अधिक झाल्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्याऐवजी इतर पर्याय निवडले आहेत. - अमेरिका-चीन व्यापार तणावात सैलावा
टॅरिफ कमी करण्याच्या निर्णयामुळे गुंतवणूकदारांनी शेअर बाजाराकडे वळणे पसंत केले. - प्रॉफिट बुकिंग
एप्रिलमध्ये दर गगनाला भिडल्यामुळे गुंतवणूकदारांनी नफा कमावण्यासाठी विक्री वाढवली. - शेअर बाजारात तेजी
जगभरात शेअर मार्केट वधारत असल्याने सोन्याची मागणी घसरली आहे. - ऑल बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष योगेश सिंघल यांच्या मते, 2013 प्रमाणे जर परिस्थिती उद्भवली, तर सोन्याचा दर प्रति औंस 1820 डॉलरपर्यंत घसरू शकतो, आणि त्यानुसार भारतातील दर 55 ते 60 हजार रुपये प्रति तोळ्यापर्यंत खाली येऊ शकतो.तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, यंदा आणि (opportunity)पुढील वर्षी सोन्यात फारसा परतावा अपेक्षित नाही, मात्र दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोने हे सुरक्षित पर्याय राहील.
हेही वाचा :
‘अटकेआधी एकनाथ शिंदेंनी मला फोन केला होता’, संजय राऊतांचा गौप्यस्फोट
गर्लफ्रेंडने व्हाट्सअॅपवर केलंय Blocked? टेन्शन घेण्याची गरज नाही, तुम्ही स्वत:च करू शकता Unblock
‘जे मोठ्या कलाकारांना जमले नाही, ते नॅन्सीने पुन्हा एकदा करून दाखवले,’ उंचावले देशाचे नाव!