संतापजनक! रुग्णालयात एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार व्हेंटिलेटरवर असताना कर्मचाऱ्याकडून घृणास्पद कृत्य

गुरूग्राममधील एका नामांकित खासगी रूग्णालयात (employee)घृणास्पद घटना घडल्याचे समोर आलेय. एका कर्मचाऱ्याने आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार केला. ४६ वर्षीय महिला व्हेंटिलेटरवर असताना कर्मचाऱ्याकडून घृणास्पद कृत्य करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात कर्मचाऱ्याविरुद्ध सदार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून तपास सुरू आहे. पीटीआयने याबाबतचे वृत्त दिले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये पोहल्यानंतर महिला आजारी पडली होती. त्यामुळे ५ एप्रिल रोजी गुरुग्राममधील नामांकित खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रविवारी तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. महिलेने आपल्या तक्रारीत ६ एप्रिल रोजी व्हेंटिलेटरवर असताना रूग्णालयातील कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याचे म्हटलेय. ४६ वर्षीय महिलेला रूग्णालयातून डिस्चार्ज (employee)मिळाला होता. त्यानंतर महिलेने आपल्यासोबत घडलेली घटना पतीला सांगितली. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्यास सुरूवात केली. पोलिसांनी नामांकित रूग्णालयाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. महिलेचा जबाब मजिस्ट्रेटसमोर नोंदवण्यात आला आहे. गुरुग्राम पोलिसांनी सांगितले की, रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरूवात केली आहे.(employee) लवकरच आरोपीची ओळख पटवली जाईल. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे. लवकरच या प्रकरणातील आरोपीला बेड्या ठोकल्या जातील.

रूग्णालयात घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे गुरूग्राममध्ये एकच खळबळ उडाली आहे. खासगी रुग्णालयातील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. वैद्यकीय क्षेत्रात रुग्णांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत. या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितलेय.

हेही वाचा :

अभिनेत्रीने भर रस्त्यात टी शर्ट काढून अस काही केलं की video viral

ऊसाचा रस किती वेळ फ्रेश राहतो? काढल्यावर कधीपर्यंत प्यायला हवा

महाराष्ट्रात हे चाललंय काय भररस्त्यात रिक्षा चालक महिलेसमोर नग्न झाला आणि