मालोजीराजे छत्रपती यांचा शिंदे गटाच्या नेत्यासोबत फोटो; पडद्यामागे नेमकं चाललंय काय?

काँग्रेसचे नेते आणि खासदार शाहू महाराज छत्रपती यांचे सुपुत्र, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांचा एक पोस्टर(group) सध्या कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. दसरा चौकात लावलेल्या या फलकावर मालोजीराजे यांचा फोटो नुकतेच शिवसेनेत शिंदे गट प्रवेश केलेल्या शरंगधर देशमुख यांच्यासोबत झळकला आहे. उद्या मालोजीराजे छत्रपती यांचा वाढदिवस असल्याने या फलकाने केवळ लक्ष वेधून घेतले नाही, तर यातून भविष्यातील राजकीय बदलाचे संकेत मिळत असल्याची जोरदार चर्चा कोल्हापुरात सुरू झाली आहे.

सातत्याने ठाकरेंच्या शिवसेनेसोबत असलेले नेते शिंदेंच्या शिवसेनेत जात असल्याच्या बातम्या येत असताना, कोल्हापूरमधील या पोस्टरने राजकीय चर्चांना उत आला आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून शरंगधर देशमुख हे काँग्रेसमधून इच्छुक होते. त्यांनी उमेदवारीसाठी दावा केला होता,(group) परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश लाटकर यांना उमेदवारी मिळाल्याने देशमुख नाराज झाले. काँग्रेसमध्ये त्यावेळी बंडखोरी झाल्याने ऐनवेळी मधुरिमाराजे छत्रपती यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली होती. मात्र, निवडणुकीच्या वेळी मधुरिमाराजे छत्रपती यांनी माघार घेतली, ज्यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाला. शहरातील एका गटामध्ये काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्याबाबत नाराजी आहे.

या नाराजीमुळेच शरंगधर देशमुख यांनी नुकताच शिवसेनेत शिंदे गट पक्षप्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत कोल्हापूर महानगरपालिकेतील तब्बल ३५ आजी-माजी नगरसेवकांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे.दरम्यान, गुरुवारी माजी आमदार मालोजीराजे यांचा वाढदिवस असल्याने शहरात ठिकठिकाणी शुभेच्छांचे पोस्टर लागले आहेत. (group)दसरा चौकातील शरंगधर देशमुख यांच्यासोबत असलेल्या मालोजीराजे यांच्या फोटोमागील भगव्या ‘बॅकग्राऊंड’मुळे भविष्यातील राजकीय संकेत दसरा चौकातून दिले आहेत का, अशी चर्चा पोस्टरच्या माध्यमातून होत आहे. हा फलक केवळ वाढदिवसाच्या शुभेच्छांचा नसून, कोल्हापूरच्या राजकारणात काही मोठे बदल होणार असल्याची शक्यता यातून व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :