मैत्रीत विश्वासघात… दोस्ताच्या गर्लफ्रेंडसोबत संबंध, संतापलेल्या बॉयफ्रेंडने जिवाभावाच्या मित्राला दगडाने ठेचलं

नागपूर : मैत्री(friend), प्रेम आणि विश्वासघात यांच्या गुंत्यातून नागपूरमध्ये एक थरारक आणि धक्कादायक खून झाला आहे. लिव्ह-इन नात्यात राहणाऱ्या प्रेयसीच्या विश्वासघातातून उफाळलेल्या रागाच्या भरात एका युवकाने आपल्या जिवलग मित्राचा दगडाने ठेचून खून केल्याची खळबळजनक घटना रविवारी रात्री अग्रसेन चौकात घडली.

मृत तरुणाचे नाव शैलेश हिरालाल (वय 30) असून, आरोपीचे नाव अनुराग बोरकर आहे. विशेष म्हणजे, दोघांची पहिली ओळख होशंगाबादच्या कारागृहात झाली होती. तिथून सुरू झालेली मैत्री(friend) पुढे नागपूरपर्यंत पोहोचली, पण विश्वासघाताने तिचा दारुण अंत झाला.

प्रेमाच्या त्रिकोणात सापडले प्राण

अनुराग बोरकर आपल्या प्रेयसी सोनू मरसकोल्हे सोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. काही दिवसांपूर्वी सोनूने अनुरागचा साथ सोडून शैलेशसोबत राहायला सुरुवात केली होती. यामुळे अनुरागच्या मनात तीव्र रागाची भावना निर्माण झाली होती. या रागातूनच त्याने आपल्या मित्राचा (friend)खून करण्याचा कट रचला.

खूनाची थरारक घटना

रविवारी रात्री अग्रसेन चौकात अनुराग आणि शैलेश यांच्यात अचानक सामना झाला. रागाच्या भरात अनुरागने बाजूला पडलेला एक मोठा दगड उचलून शैलेशच्या डोक्यावर आणि छातीत जोरात मारला. शैलेश जागीच कोसळला आणि रक्ताच्या थारोळ्यात पडला. नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यावर ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि शैलेशला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पोलिसांचा तपास सुरू

या खून प्रकरणी तहसील पोलिसांनी आरोपी अनुराग बोरकरला अटक केली असून त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

या घटनेने नागपूर शहर हादरून गेले असून, मैत्री आणि विश्वासघाताच्या मर्यादा किती धोकादायक ठरू शकतात, याचा भयावह प्रत्यय समाजाला आला आहे.

हेही वाचा :