रस्त्यावरुन उचलून ज्या अनाथ मुलीला मोठं केलं, तिनेच केली आईची हत्या; दोन प्रियकर घरी बोलावले अन् उशीने…

तीन वर्षांची असताना रस्त्याच्या कडेला पडलेल्या ज्या मुलीला मायेचं(mother) छत्र दिलं तिनेच हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीने दोघांच्या मदतीने आपल्यात दत्तक आईला ठार केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठवीत शिकणाऱ्या 13 वर्षीय विद्यार्थिनीने तिच्या दोन मित्रांसह 29 एप्रिल रोजी गजपती जिल्ह्यातील परलाखेमुंडी शहरातील भाड्याच्या घरात 54 वर्षीय राजलक्ष्मी कर यांचीहत्या करण्याचा कट रचला होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, राजलक्ष्मी यांचा मुलीच्या दोन तरुणांसोबतच्या संबंधांना असणारा विरोध आणि मालमत्तेवर नियंत्रण मिळवण्याची इच्छा हे यामागील कारण होतं.

मुलीने(mother) आधी राजलक्ष्मी यांना झोपेच्या गोळ्या देऊन नंतर उशीच्या सहाय्याने गळा दाबल्याचा आरोप आहे. त्यानंतर राजलक्ष्मी यांना रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. दुसऱ्या दिवशी, भुवनेश्वरमध्ये मृतदेहावर नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईकांनी हृदयविकाराने मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं.

यानंतर जवळपास दोन आठवडे कोणालाही थांगपत्ता लाग नाही. पण एके दिवशी राजलक्ष्मी यांच्या भावाला मुलीचा फोन सापडला जो तिने भुवनेश्वरलाच ठेवला होता. यावेळी त्याने इंस्टाग्राम चॅट पाहिलं असता हत्येचा कट उलगडला. यामध्ये राजलक्ष्मी यांच्या हत्या करण्यासंबंधी आणि दागिने, पैसे लुटण्याचा उल्लेख होता.

यानंतर राजलक्ष्मी यांच्या भावाने पोलीस ठाण्यात तक्रार केली. ज्याच्या आधारे मुलीसह मंदिरातील पुजारी गणेश (21) आणि मित्र दिनेश साहू (20) यांना अटक करण्यात आली. गजपतीचे पोलिस अधीक्षक (एसपी) जतिंद्र कुमार पांडा यांनी सांगितलं आहे, राजलक्ष्मी आणि त्यांच्या पतीला सुमारे 14 वर्षांपूर्वी भुवनेश्वरमध्ये रस्त्याच्या कडेला एक लहान मुलगी सापडली होती. मूल नसल्याने या जोडप्याने बाळाला घरी नेले आणि स्वत:चं मूल असल्याप्रमाणे वाढवलं.

राजलक्ष्मी(mother) यांच्या पतीचं यानंतर अवघ्या एका वर्षात निधन झालं. तेव्हापासून त्यांनी एकट्याने मुलीचं संगोपन केले. काही वर्षांपूर्वी, त्या परलाखेमुंडी येथे राहायला गेल्या जेणेकरून तिची मुलगी केंद्रीय विद्यालयात शिक्षण घेऊ शकेल. त्यांनी मुलीला तिथे तिला प्रवेश दिला आणि शहरात भाड्याने घर घेतलं.

यानंतर मुलगी गणेश आणि दिनेश यांच्यासह नात्यात आली. दोघेही वयामध्ये तिच्यापेक्षा मोठे होते. राजलक्ष्मी यांनी नात्याला विरोध केला असता, दोघींमध्ये वाद झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश यानेच हत्येसाठी उकसवलं होतं. आईची हत्या केल्यास आपण विरोधाविना नातं सुरु ठेवू शकतो आणि संपत्तीही मिळवू शकतो असं त्याने मुलीला सांगितलं होतं.

29 एप्रिलच्या रात्री मुलीने तिच्या आईला(mother) झोपेच्या गोळ्या दिल्या. राजलक्ष्मी बेशुद्ध पडल्यानंतर तिने रथ आणि साहू यांना बोलावलं. त्यानंतर तिघांनी उशीने राजलक्ष्मी यांचा गळा दाबला. राजलक्ष्मी यांना रुग्णालयात नेण्यात आलं असता मृत घोषित करण्यात आलं. मुलीने कुटुंबातील सदस्यांना आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची खोटी माहिती दिली होती. राजलक्ष्मी यांना ह्रदयाचे विकार असल्याने सर्वांचा यावर विश्वास बसला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीने राजलक्ष्मी यांचे काही सोन्याचे दागिने रथला दिले होते. त्याने ते सुमारे 2 लाख 40 हजारांना हाण ठेवले होते. पोलिसांनी आरोपीकडून सुमारे 30 ग्रॅम सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेले तीन मोबाईल फोन आणि दोन उशा जप्त केल्या आहेत.

हेही वाचा :

‘अटकेआधी एकनाथ शिंदेंनी मला फोन केला होता’, संजय राऊतांचा गौप्यस्फोट

गर्लफ्रेंडने व्हाट्सअ‍ॅपवर केलंय Blocked? टेन्शन घेण्याची गरज नाही, तुम्ही स्वत:च करू शकता Unblock

‘जे मोठ्या कलाकारांना जमले नाही, ते नॅन्सीने पुन्हा एकदा करून दाखवले,’ उंचावले देशाचे नाव!