बळीराजाला दिलासा, सर्वसामान्यांना आनंदवार्ता; मिडल क्लास लोकांना 2025 मध्ये मिळणार Good News!

रेपो दरात आणखी कपात करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी रिझर्व्ह बँक सध्याच्या परिस्थितीत ‘थांबा आणि पहा’ हे धोरण अवलंबेल, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले आहे.(policy ) महागाई कमी होत असल्याने, रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने रेपो दरात कपात केली आहे आणि ‘तटस्थ भूमिका’ स्वीकारली आहे. यामुळे भविष्यात दर कमी करण्याची किंवा वाढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मल्होत्रा म्हणाले की, महागाईच्या अंदाजाबाबत अंतर्गत मूल्यांकन केले जात आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक पुढील महिन्याच्या सुरुवातीला होणार आहे.

चालू आर्थिक वर्षात ग्राहक किंमत निर्देशांक सीपीआय आधारित महागाईचा दर सरासरी चार टक्के राहण्याचा अंदाज क्रिसिल या रेटिंग एजन्सीने आपल्या ताज्या संशोधन अहवालात वर्तवला आहे. क्रिसिलने मागील आर्थिक वर्षासाठी 4.6 टक्के सीपीआय चलनवाढीचा अंदाज दिला होता.भारतीय हवामान विभागाद्वारे सामान्यपेक्षा जास्त पावसाच्या अंदाजामुळे अन्नधान्य महागाई कमी राहण्याची शक्यता असल्याचे एजन्सीने म्हटले आहे. अहवालानुसार, कमी झालेल्या वस्तूंच्या किमतींमुळे बिगर-अन्नधान्य महागाई कमी राहण्याची शक्यता आहे.(policy ) सीपीआय महागाई ही रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणातील रेपो दराबाबतच्या निर्णयावर परिणाम करमारा घटक आहे.

अहवालानुसार, कमी झालेल्या वस्तूंच्या किमतींमुळे बिगर-अन्नधान्य महागाई कमी राहण्याची शक्यता आहे. सीपीआय महागाई ही रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणातील रेपो दराबाबतच्या निर्णयावर परिणाम करमारा घटक आहे. क्रिसिलनुसार, जीडीपी वाढ 6.5 टक्के राहण्याचा अंदाज आहे. अमेरिकेने केलेल्या आयातशुल्क बदलांमुळे निर्यातीसाठी धोका निर्माण झाला असला, तरी पुरेसा पाऊस आणि रेपो दरातील कपात यांसारखे देशांतर्गत घटक वाढीसाठी पूरक ठरतील, असे एजन्सीने सांगितले.

अर्थव्यवस्थेमध्ये पुरेशी तरलता असल्यामुळे आर्थिक स्थिती चांगली राहील. (policy ) मात्र त्याचवेळी भांडवली प्रवाह आणि रुपया दोन्ही अस्थिर राहण्याची शक्यता आहे.बँकांची पतपुरवठा वाढ अपेक्षेप्रमाणे नाही. मे २०२५पर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार, पहिल्या तिमाहीत बँक पतपुरवठ्यात कमी वाढ दिसून आली आहे.महागाई कमी झाल्यामुळे पतधोरण समितीला या आर्थिक वर्षात रेपो दरात पुन्हा एकदा कपात करण्याची आणि त्यानंतर काही काळ तो स्थिर ठेवण्याची संधी मिळेल. तथापि, जागतिक अनिश्चिततेमुळे भांडवली प्रवाह आणि चलन हालचाल यामध्ये अस्थिरता राहू शकेल.

हेही वाचा :