वडाच्या झाडाला पूजण्याची प्रथा वटपौर्णिमेच्या दिवशी विशेषतः आहे.(joint ) पण तुम्हाला माहिती आहे का वडाच्या झाडाला आयुर्वेदात आणि पारंपरिक औषधोपचारात खूप महत्त्व आहे. हे झाड अनेक प्रकारे औषधीय उपयोगासाठी वापरले जाते. नेमके काय आहेत वडाच्या झाडाचे आयुर्वेदिक फायदे? याबद्दलचं आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. अभिजीत गुंजाळ यांनी माहिती दिली आहे.हिंदू संस्कृतीत वडाचे झाड पूजनीय मानले जाते. अक्षय सौभाग्यासाठी सुवासिनी वटपौर्णिमेला वडाचे पूजन करतात. त्यामागे पतीचे अखंड सौभाग्य मिळावे हा तर हेतू असतोच, पण वडाचे झाड जसे दीर्घ आयुष्य असते तसा माझा पती दीर्घायुषी व्हावा, कुळाचा वंशविस्तार चांगला व्हावा अशी ही भावना असते. कारण वडाची पारंबी जमिनीला लागतात, त्याला मुळे पकडून नवीन वृक्षात रूपांतर होते.
तसेच वडाचे झाड आतून थंड, शीतविर्याचे असल्याने शरीरातील पित्त, (joint ) रक्त, दृष्टीसाठी पाने, साल वापरले जातात. तसेच वारंवार तोंड येणे, पित्तवृद्धी त्यासाठीही आपण वडाच्या पानाचा काढा आणि त्यात जर खडीसाखर मिसळून दिवसातून चार ते पाच वेळा गुळण्या केल्यास फायदा होतो, असं डॉ. अभिजीत गुंजाळ सांगतात.त्याचप्रमाणे विसरभोळ नागिन, त्यावर पण वडाच्या पानाचा लेप लावून त्याची आग कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे सांधेदुखीत म्हणजेच गुडघा सुजणे, ठणकणे त्यावर पण वडाची पाने तळव्यावर ठेवून सांध्यावर बांधल्यास त्याच्या वेदना, सूज कमी होते.
तसेच मूत्रदाह, यावर पण वडाच्या पानाचा रस गुणकारी उपाय आहे. (joint ) त्याचप्रमाणे केस गळतीवरही वडाच्या पारंब्यांचे चूर्ण करून काढा बनवून तीळ किंवा खोबरेल तेलात मिसळून केल्यास कोंडा होऊन केस गळणे थांबते.श्वेतप्रदर म्हणजेच अंगावरून पांढरा स्त्राव जातो त्यासाठीही वडाच्या सालीचा काढा बनवून त्याने शेक घेतल्यास आराम भेटतो. त्याचप्रमाणे भरून न येणाऱ्या जखमा, यासाठीही वडाच्या झाडाचे चूर्ण, काढा बोलवून घेतल्यास त्या जखमा भरण्यात मदत होते,असंही डॉ. अभिजीत गुंजाळ सांगतात.
हेही वाचा :