साखरपुड्यानंतर शरीरसंबंध, दीड वर्षानंतर लग्नाला नकार; भाजप आमदाराच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा

कर्नाटकचे माजी मंत्री आणि भाजप आमदार प्रभू चौहान यांचा मुलगा प्रतीक चौहान याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.(refusal)एका तरुणीने बिदर महिला पोलीस ठाण्यात प्रतीक विरोधात तक्रार दाखल केली. प्रतीकने वारंवार अत्याचार केल्याचा आरोप तिनं केलाय. यानंतर प्रतीकविरोधात बलात्कार, धमकी आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.पीडितेनं आरोप केला की, प्रतीकसोबत २५ डिसेंबर २०२३ रोजी तिचा साखरपुडा झाला. पण लग्नाचं आमिष दाखवून तिचं शोषण करण्यात आलं. बंगळुरू, लातूर, शिर्डीतील खासगी हॉटेल्ससह अनेक ठिकाणी तिच्यावर अनेकदा बलात्कार करण्यात आला असंही तक्रारीत म्हटलं आहे.

पीडितेनं दावा केला की, जेव्हा जेव्हा शरीरसंबंध ठेवण्यासाठी नकार दिला तेव्हा तेव्हा प्रतीकने लग्न न करण्याची धमकी दिली.(refusal)तीन वेळा लातूरला नेलं आणि प्रत्येक वेळी बळजबरी करत संबंध ठेवले. प्रतीक चौहान याच्यावर पीडितेने अनेक गंभीर आरोप केलेत. पोलिसात तक्रार दिल्यानंतर प्रतीकवर बलात्काराचा गु्न्हा दाखल झाला आहे.प्रतीकसोबत ५ जुलैला शेवटचं भांडण झालं होतं. पीडिता आणि तिचं कुटुंबिय लग्नाची तारीख ठरवायला प्रतीकच्या घरी गेले होते. तेव्हा प्रतीकच्या कुटुंबियांनी आमचा मुलगा तुमच्या मुलीशी लग्न करणार नाही, काय करायचं ते करा असं सांगून तिथून पीडितेच्या कुटुंबियांना बाहेर काढण्यात आलं.

दरम्यान, प्रभू चौहान यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना हे राजकीय षडयंत्र असल्याचं म्हटलंय. (refusal)bमाझ्या मुलाचा साखरपुडा झाला होता हे खरं आहे पण दोघांच्या सहमतीने हे लग्न मोडलं. तरुणीच्या भविष्याच्या दृष्टीने लग्न मोडण्याचं कारण इथं उघड करणं योग्य नाही. कारण आणि पुरावे तरुणीच्या पालकांना आधीच देण्यात आलेत. माझ्या विरोधकांकडून घरच्या मुद्द्यांवरून राजकारण करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. राजकीयदृष्ट्या मला पराभूत करता येत नसल्यानं अशा प्रकारे आरोप केले जात आहेत.

हेही वाचा :