शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

जळगाव जिल्ह्यातून मोठी आणि राजकीयदृष्ट्या(politics) संवेदनशील बातमी समोर आली आहे. मुक्ताईनगरचे शिवसेना (शिंदे गट) आमदार चंद्रकांत निंबाजी पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राष्ट्रीय महामार्ग भूमी अधिग्रहण प्रकरणावरून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात त्यांनी सहभाग घेतल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले.

नेमकं काय प्रकरण घडलं? :
सध्या इंदूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी खामखेडा परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. मात्र, न्याय मोबदला न मिळाल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं असून अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केल्याने आंदोलन अधिक तीव्र झालं आहे.

काही दिवसांपूर्वीच महामार्ग ठेकेदाराने बळजबरीने जेसीबी घालून शेतकऱ्यांचे(politics) केळीचे पीक जमीनदोस्त केलं होतं. या अमानुष कृतीमुळे संतप्त शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलं. यावेळी पोलिसांशी झटापट झाली होती. तरीही प्रशासनाकडून तोडगा न निघाल्याने शेतकरी अधिक आक्रमक झाले आहेत.

आमदार चंद्रकांत पाटील आंदोलनात सहभागी :
या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनीही शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. २२ जुलै रोजी सकाळपासून शेतकऱ्यांसोबत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आमदारांच्या उपस्थितीमुळे वातावरण अधिकच चिघळलं आणि प्रशासनाने तात्काळ पोलिस कारवाई करत आंदोलनकर्ते शेतकरी व आमदार पाटील यांना ताब्यात घेतलं.

प्राथमिक माहितीनुसार, आमदार चंद्रकांत पाटील यांना भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात नेण्यात आलं असून यासंदर्भात राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे भाजप-शिवसेना युती सरकारवर शेतकरी विरोधी कारवाईचे आरोप होऊ लागले आहेत.

हेही वाचा :