शिक्षकाचं धक्कादायक कृत्य शाळेतच महिला शिक्षिका अन् विद्यार्थिनींचा करायचा विनयभंग

मुलुंडमधील एका शाळेमध्ये शिक्षकानेच (female)महिला शिक्षिका आणि विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची धक्कादायक प्रकार घडला आहे. शाळेतच हा विकृत शिक्षक महिला शिक्षिका आणि विद्यार्थिनींना टार्गेट करायचा. त्यांच्याकडून मोबाइल नंबर घेऊन रात्री-अपरात्री त्यांना कॉल करून त्रास द्यायचा. या शिक्षकाच्याविरोधात मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी शाळेमध्ये राडा केला.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंडमधील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये एका विकृत शिक्षकाने शाळेतील शिक्षिकांना रात्री १२ च्या नंतर फोन करून शिवीगाळ करत अश्लील शब्द वापरले. (female)त्याचसोबत त्याने शाळेतील विद्यार्थिनींची छेड काढण्याचा प्रकार देखील समोर आला आहे. या विकृत शिक्षकाला मुंलुंडमधील मनसे कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला.

शाळेमधील शिक्षकाचे कृत्य ऐकून संतप्त झालेल्या (female)मनसैनिकांनी शाळेत जाऊन राडा केला. मनससैनिकांनी याप्रकरणी आज शाळेत जाऊन या मॅनेजमेंटला धारेवर धरत शिक्षकाला चांगलाच धडा शिकवला. या शिक्षकाला चोप देत त्याच्या तोंडावर कोळसा फेकून मारला. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी या विकृत शिक्षकाला ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलिस करत आहेत.

हेही वाचा :

अभिनेत्रीने भर रस्त्यात टी शर्ट काढून अस काही केलं की video viral

ऊसाचा रस किती वेळ फ्रेश राहतो? काढल्यावर कधीपर्यंत प्यायला हवा

महाराष्ट्रात हे चाललंय काय भररस्त्यात रिक्षा चालक महिलेसमोर नग्न झाला आणि