पुणे : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात( political news) विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच पुण्यात वेगळचं राजकारण पाहिला मिळत आहे. महायुतीमध्ये प्रवेश केल्यानंतरही रवींद्र धंगेकरांकडून हेमंत रासने यांच्यावर हल्लाबोल सुरुच आहे. पोलिस अधिकारी विनयभंग प्रकरणात आमदार हेमंत रासने यांनाही सहआरोपी करावे, अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी पोलीस आयुक्ताकडे केली आहे. या प्रकरणामुळे महायुतीमध्ये गेल्यानंतरही रवींद्र धंगेकर आणि हेमंत रासने यांच्यात संघर्ष असल्याचे पाहायला मिळत आहे.
भारतीय जनता पक्षाचा पुण्यातील पदाधिकारी असेलल्या प्रमोद कोंढरेने( political news) दोन दिवसांपूर्वी शनिवारवाडा परिसरात एका पोलिस अधिकारी महिलेचा विनयभंग केला होता. या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर प्रमोंद कोंढरे यांच्यावर फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हा संपूर्ण प्रकार कसब्याचे आमदार हेमंत रासने यांच्यासमोर घडला. रासने यांनी प्रमोद कोंढरेला समज देणे आवश्यक होते. पण असे काहीही घडले नाही. त्यामुळे या प्रकरणात हेमंत रासने यांना देखील सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत रविंद्र धंगेकर काँग्रेसकडून होते. तर महायुतीकडून रासने यांनी निवडणूक लढवली. यावेळी सुद्धा या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अगदी सोशल मीडियापासून ते पोस्टर वॉरपर्यंत वाद रंगले होते.
धंगेकर यांनी कसब्याचे आमदार हेमंत रासने यांच्यावर टीका केली आणि इतकचं नाही तर त्यांना सहआरोपी करा, अशी अजब मागणी केली. त्यामुळे महायुतीत संघर्ष आहे का असा प्रश्न उपस्थितीत होतोय. पालकमंत्री नियुक्तीचा तिढा सोडवताना महायुतीच्या घटकपक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच झाली. आता नियुक्तीनंतर पुन्हा त्यात भरच पडली असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ज्येष्ठांना डावलल्याने नाराजीचा सूर आहे. सबंध राज्यभरातील शिंदेंचे शिवसैनिक भाजपवर उघड नाराजी व्यक्त करत असून, याबाबत स्पष्टता असावी अशी भूमिका व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :