देशातील प्रमुख टेलिकॉम कंपनी असलेल्या जिओचे करोडो युजर्स आहेत. प्रत्येक युजर्स जास्त फायद्यांसह स्वस्त रिचार्ज प्लॅनच्या शोधात असतो. कंपनी वेगवेगळ्या फायद्यांसह त्यांच्या ग्राहकांना वेगवेगळ्या किंमतीचे रिचार्ज(recharge)प्लॅन ऑफर करत असते. काही प्लॅन्सची किंमत जास्त असते तर काहींची किंमत 100 रुपयांपेक्षाही कमी असते. शिवाय या प्लॅनमध्ये ग्राहकांच्या मनासारखे फायदे देखील ऑफर केले जातात.
असं असलं तरी प्रत्येकजण अशा रिचार्ज(recharge) प्लॅन्सच्या शोधात नक्की असतो ज्यामध्ये जास्त फायदे ऑफर केले जातात पण त्यांची किंमत कमी असते. आता आम्ही तुम्हाला जिओच्या अशाच काही रिचार्ज प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत. ज्यामध्ये अनलिमिटेड फायदे ऑफर केले जात आहेत, शिवाय या रिचार्ज प्लॅन्सची किंमत 300 रुपयांपेक्षा कमी आहे. म्हणजेच हे प्लॅन्स प्रत्येकाला परवडणारे आहेत. जर तुम्हीही कमी किमतीत जास्त फायदे देणारा प्लॅन शोधत असाल, तर जिओच्या त्या 5 प्लॅनबद्दल जाणून घ्या जे भरपूर फायदे देतात.
299 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
या प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड 5जी डेटा ऑफर केला जातो. या प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे. तुम्ही 28 दिवसांसाठी दररोज 1.5 जीबी डेटा ऑफर केला जातो. दररोजचा डेटा संपल्यानंतरही तुम्ही कमी वेगाने इंटरनेटचा वापर करू शकता. जिओ अॅप्स व्यतिरिक्त, तुम्हाला दररोज अमर्यादित कॉल आणि 100 एसएमएसचा फायदा मिळतो.
259 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
जिओच्या 259 रुपयांच्या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगचे फायदे मिळतात. याशिवाय, तुम्हाला दररोज 1.5 जीबी डेटा आणि 100 एसएमएसचा फायदा मिळतो. या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी 30 दिवसांची आहे.
249 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
249 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह तुम्हाला दररोज 1 जीबी डेटाचा फायदा मिळतो. जिओ अॅप्स व्यतिरिक्त, वापरकर्त्यांना अमर्यादित कॉलिंग आणि मोफत 100 एसएमएसचा फायदा मिळेल.
186 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
जिओचा 24 दिवसांच्या व्हॅलिडीटीवाला रिचार्ज प्लॅन 186 रुपयांमध्ये ऑफर केला जातो. या प्लॅनमध्ये तुम्हाला तुम्हाला अमर्यादित कॉलिंगचा फायदा मिळतो. या प्लॅनमध्ये दररोज 1 जीबी डेटा आणि 100 एसएमएसची सुविधा देखील आहे.
129 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
जिओच्या 129 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 2 जीबी डेटाचा फायदा मिळतो. या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे. यात नॉन-जिओ सिम कॉलिंगचाही फायदा मिळतो. या प्लॅनमध्ये 300 एसएमएसचा फायदा मिळेल.
तुम्ही देखील जिओच्या स्वस्त रिचार्ज प्लॅनच्या शोधात असाल तर हे प्लॅन्स तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहेत. कारण यामध्ये कमी किंमतीत जास्त फायदे ऑफर केले जात आहेत.
हेही वाचा :