कांदा खाल्याने शरीराला भरपूर प्रमाणात फायदे मिळतात. स्वयंपाक घरात सगळ्यात महत्वाच्या भांज्यांच्या यादीमध्ये कांदा असतो.(onion ) कांद्याने फक्त जेवण चविष्ठ होत नाही तर त्याने शरीर सुद्धा थंड होते. तसेच अनेक आजारांपासून लांब राहण्यास मदत होते. तुम्ही मोठ्यांना पाहीलेच असेल, जेवताना थाळीमध्ये त्यांना कांदा लागतो. ही सवय अत्यंत चांगली आहे. पुढे आपण रोजच्या आहारातल्या कांद्याचे तुम्ही कधीही न वाचलेले गुणधर्म आणि शरीराला होणारे भन्नाट फायदे जाणून घेणार आहोत.
यूनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ अॅर्गीकल्चर च्या रिपोर्ट नुसार, कांद्यामध्ये १ नाहीतर अनेक व्हिटॅमिन असतात.(onion ) त्यामध्ये व्हिटॅमिन सी, ई आणि बी ६ असे व्हिटॅमिन असतात. तसेच फोलेट, पोटॅशिअम, फायबर, मॅग्नेशियम, फ्लेवोनोइड्स, ग्लुटाथिओन, सेलेनियम असे पोषक तत्व असतात. जे तुमच्या संपुर्ण शरीरासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात.
कांदा खाण्याचे फायदे
आजारी पडण्यामागचं एक कारण म्हणजे फ्री रेडिकल्स आहे. तुम्ही जेव्हा कांदा सेवन करता. (onion ) तेव्हा तुम्हाला व्हिटॅमिन सी मिळते आणि फ्लेवोनोइड्स अॅंटीऑक्सिडेंट्स मिळतात. त्याने तुमच्या शरीरातला फ्री रेडिकल्सचा धोका कमी होतो.
डायबेटीजच्या रुग्णांना फायदे
कांदा खाल्याने ब्लड शुगर कंट्रोलमध्ये येण्यास मदत होते. कांद्यामध्ये सल्फर आणि क्वेरसेटिन सारख्या अॅंटीऑक्सिडेंट्स आढळतात. त्यामुळे शरीरातले कोलेस्ट्रोल तुमच्या नकळत कमी होते. त्यामुळे कांदा हा जेवणासाठी आणि शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. तसेच कांदा सेवन केल्याने हाडं मजबूत होतात. सर्दी, खोकला, ताप, गळ्यामध्ये खवखव कमी होते.
हेही वाचा :