पुरुषांपेक्षा महिलांना झोप जास्त गरजेची; अभ्यासातून समोर आलं चकित करणारं कारण

प्रत्येक व्यक्तीला झोप ही गरजेची असतेच. शरीर फीट आणि फाईन राहावं यासाठी (reveals)आपल्याला झोप गरजेची असते. मात्र नुकत्याच समोर आलेल्या एका अभ्यासानुसार, पुरुषांच्या तुलनेत महिलांना जास्त झोपेची गरज असते, असं म्हटलंय. यामध्ये महिलांचा मेंदू अधिक जटिल पद्धतीने काम करतो, असंही नमूद करण्यात आलंय.’द इंडिपेंडेंट’मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासातून हे समोर आलं आहे. यामध्ये महिलांना पुरुषांपेक्षा २० मिनिटं जास्त झोपेची आवश्यकता असते. कारण त्यांचा मेंदू जास्त काम करतो, असं संशोधकांचं म्हणणं आहे. ड्यूक विद्यापीठातील प्रोफेसर जिम हॉर्न यांनी याबाबत संशोधन केलं आहे.

हा अभ्यास २१० मध्यमवयीन पुरुष आणि महिलांच्या नमुन्यावर करण्यात आला होता. अभ्यासाचे लेखक जिम हॉर्न हे झोपेचे तज्ज्ञ आणि लॉफबरो विद्यापीठातील स्लीप रिसर्च सेंटरचे पूर्वीचे संचालक आहेत. ते म्हणाले की, “झोपेचे एक प्रमुख कार्य म्हणजे मेंदूला स्वतःला बरं करण्यास आणि दुरुस्त करण्यास परवानगी देणं. (reveals)गाढ झोपेच्या वेळी, कॉर्टेक्स जे विचार, स्मृती, भाषा इत्यादींसाठी जबाबदार मेंदूचा भाग मानला जातो तो इंद्रियांपासून वेगळा होतो आणि रिकवरी मोडमध्ये जातो.”

संशोधनानुसार, महिला दिवसभरात अनेक कामे एकाच वेळी करतात. म्हणजेच त्या मल्टी-टास्किंग असतात. यामुळे त्यांच्या मेंदूचा अधिक वापर होतो आणि मेंदूच्या विविध भागांवर अधिक ताण येतो. त्यामुळे मेंदूला दिवसभराच्या कामातून उसंत देण्यासाठी आणि स्वतःची दुरुस्ती करण्यासाठी झोपेची गरज असते. महिलांचा मेंदू अधिक एक्टिव्ह आणि जटिल असल्याने, त्याला पुरुषांपेक्षा जास्त वेळ ‘रिकवर’ होण्यासाठी लागतो.

२० मिनिटं अधिक झोपेची गरज
या अभ्यासात असं दिसून आलंय की, महिलांना पुरुषांपेक्षा सरासरी 20 मिनिटं जास्त झोपेची गरज असते. हा एक सरासरी आकडा आहे, काही महिलांना यापेक्षा कमी किंवा जास्त झोपेची गरज असू शकते, (reveals)असं संशोधकांचं म्हणणं आहे.

झोपेच्या कमतरतेचे परिणाम
या अभ्यासातून हे स्पष्ट होतंय की, महिलांच्या झोपेच्या गरजा पुरुषांपेक्षा वेगळ्या असू शकतात. यामध्ये मासिक पाळी, गर्भधारणा आणि रजोनिवृत्ती यांसारख्या हार्मोनल बदलांमुळेही महिलांच्या झोपेच्या पद्धतींवर परिणाम होत असतो. याशिवाय महिलांमध्ये झोपेच्या कमतरतेमुळे मानसिक ताण, नैराश्य आणि राग यांसारख्या समस्या अधिक प्रमाणात दिसून येतात.

हेही वाचा :

भाजप नेत्याचा ‘तो’ VIDEO व्हायरल, कार्यालयातच महिलेच्या मिठीत पडून..

‘तुझा नंबर दे… सेक्सी दिसतेस’, सुदेश म्हशीलकरचा मराठी अभिनेत्रीला अश्लील मेसेज

आयपीएल 2025 मध्ये टॉप 2 मध्ये कोण जाणार? जाणून घ्या अंतिम समीकरण