असा होणार आठवड्याचा शेवट, ‘हे’ शेअर्स चमकवणार गुंतवणूकदारांचं नशिब! काय म्हणाले तज्ज्ञ?

गुरुवारी  रोजी शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली होती. शेअर बाजार वाढीसह उघडला(notebooks) असला तरी देखील घासरणीसह बंद झाला. त्यामुळे काही गुंतवणूकदारांना नुकसान सहन करावं  लागलं.

११ जुलै रोजी आज आठवड्याच्या शेवटी शेअर बाजाराची सुरुवात कशी होणार, आज गुंतवणूकदारांचं नशिब पालटण्यासाठी कोणते शेअर्स फायद्याचे ठरणार आणि आज गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांनी कोणता सल्ला दिला आहे, याबाबत जाणून घेऊया. जागतिक बाजारातील मिश्र संकेतांमुळे, शुक्रवारी म्हणजेच आज ११ जुलै रोजी देशांतर्गत शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, घसरणीसह उघड्याची अपेक्षा आहे.

गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची कमकुवत सुरुवात दर्शवितात. (notebooks) गिफ्ट निफ्टी २५,२९०.५० च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ १३३ अंकांनी कमी होता. या सर्व संकेतांचा विचार करून तज्ज्ञांनी असा अंदाज वर्तवला आहे की, आज शेअर बाजार घसरणीसह उघडण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य – istockphoto)

गुरुवारी १० जुलै रोजी काल, देशांतर्गत शेअर बाजार घसरणीसह बंद झाला, ज्यामुळे सलग दुसऱ्या सत्रात तोटा झाला. सेन्सेक्स ३४५.८० अंकांनी म्हणजेच ०.४१% ने घसरून ८३,१९०.२८ वर बंद झाला, तर निफ्टी ५० १२०.८५ अंकांनी म्हणजेच ०.४७% ने घसरून २५,३५५.२५ वर बंद झाला. गुरुवारी बँक निफ्टी निर्देशांक २५७.५५ अंकांनी किंवा ०.४५% ने घसरून ५६,९५६.०० वर बंद झाला. निफ्टी मिडकॅप १०० आणि स्मॉलकॅप १०० निर्देशांक प्रत्येकी ०.३% घसरल्याने व्यापक बाजारांमध्येही कमकुवतपणा दिसून आला.

प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांसाठी JSW एनर्जी , सॅजिलिटी इंडिया आणि UTI AMC या शेअर्सची शिफारस केली आहे. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतवणूकदारांना डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर , एसपीएमएल इन्फ्रा,(notebooks) इंजिनिअर्स इंडिया , रेलिगेअर एंटरप्रायझेस आणि पीसीबीएल केमिकल हे ब्रेकआउट स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे.

चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया, आनंद राठी येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिल्लाधर येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपलक्कल यांनी आज गुंतवणूकदारांसाठी काही शेअर्सची शिफारस केली आहे. तज्ज्ञांनी आज गुंतवणूकदारंसाठी एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेड (एनवायकेएए), ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड, एसबीआय लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, बीएफ युटिलिटीज लिमिटेड, हबटाउन लिमिटेड आणि पॅरामाउंट कम्युनिकेशन्स लिमिटेड हे इंट्राडे स्टॉक्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करणाऱ्या स्टॉक्समध्ये सेगिलिटी इंडिया , धनी सर्व्हिसेस आणि रतनइंडिया एंटरप्रायझेस यांचा समावेश आहे.

हेही वाचा :