Union बँकेमध्ये भरती! पगार ऐकून व्हाल आनंदी; ताबडतोब करा अर्ज

अनेक जणांनी बँकिंग इन फायनान्स तसेच वाणिज्या संबंधित अनेक कोर्स केले असतील पण सध्या ते नोकरीच्या शोधत असतील.(Recruitment) जर तुमच्यापैकी असे कुणी आहे? तर नक्कीच हे लेख तुमच्या उपयोगाचे आहे. कारण Union Bank या सरकारने बँकेने भरतीला सुरुवात केली आहे. एका पदासाठी नव्हे, तर विविध पदांना या भरतीच्या माध्यमातून भरण्यात येणार आहे. अगदी १० वी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठीही येथे जागा रिक्त आहेत. महत्वाचे म्हणजे सरकारी बँक असल्यामुळे नोकरीही सरकारी असेल आणि मिळणार पगारही भरघोस असेल, त्यामुळे या सुवर्णसंधीचा लाभ घ्या.

Union Bank मध्ये ऑफिस असिस्टंट, अटेण्डर, माळी तसेच फॅकल्टी पदासाठी भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. या भरतीसाठी काही शैक्षणिक निकष आणि वयोमर्यादेसंदर्भात निकष जाहीर करण्यात आले आहे. एकंदरीत, ऑफिस असिस्टंट पदासाठी उमेदवार ग्रॅज्युएट असणे अनिवार्य आहे. (Recruitment)फॅकल्टी पदासाठी ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवार अर्ज करू शकतो. अटेंडर पदासाठी दहावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतो आणि माळी पदासाठी किमान ७वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.

अर्ज करण्यासाठी किमान २२ वर्षे आयु असणारे उमेदवार अर्ज करू शकतात. तर जास्तीत जास्त ४० वर्षे वय असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत. ३०,००० रुपये पगार फॅकल्टी असिस्टंट या पदासाठी निश्चित करण्यात आले आहे. तर ऑफिस असिस्टंट पदासाठी २०,००० पगार निश्चित करण्यात आला आहे. (Recruitment)अटेंडर पदासाठी १४,००० रुपये तर माळी पदासाठी १२,००० पगार निश्चित करण्यात आला आहे.

पाऊलवाट फाउंडेशनतर्फे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदतीचा पुढाकार! ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रवासाला मिळाला भक्कम या भारतीसंबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी Union Bank च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यात यावी. तसेच अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे असल्यामुळे उमेदवारांना या संकेतस्थळाला भेट देणे अनिवार्य आहे.

हेही वाचा :