देवळी कोनाडे, कुस्तीचा आखाडा, बहुरूपी व समूह आणि इतर अनेक विविध विषयांबरोबरच मी महाराष्ट्रातील ढोलकी(diverse culture) फडाचा तमाशा आणि पंढरीची वारी या लोकपरंपरांचेही छायाचित्रण अनेक वर्षे करत आहे. या लोकपरंपरांचा गाभा पकडण्याचा प्रयत्न मी केला. तमाशा आणि वारीमधील सामान्य माणसांच्या छायाचित्रणाला महत्त्व दिले.
ऐतिहासिक ठिकाणे, अपरिचित माणसे, निसर्ग, समाजाची सांस्कृतिक वैशिष्ट्ये, भावना आणि नातेसंबंध हे सर्व छायाचित्रांचे विषय म्हणून महत्त्वाचे आहेतच, पण मग त्या प्रत्येक विषयाची छायाचित्रे, उत्तम फोटो डॉक्युमेंट्स अर्थात छायाचित्र दस्तावेज मानली जातात का? मी म्हणेन, जी छायाचित्रे आपल्याला आपल्या जगाबद्दल काहीतरी महत्त्वाचे सांगत असतात (diverse culture) आणि त्याचबरोबर जगाबद्दल आपल्याला एका नवीन पद्धतीने विचार करायला भाग पडतात, ती छायाचित्रे उत्तम छायाचित्र दस्तावेज मानली जातात.
छायाचित्रणाच्या पावणे दोनशे वर्षांच्या इतिहासाकडे नजर टाकली असता, छायाचित्रणाचे अनेक टप्पे आपल्याला पाहायला मिळतात. पहिला टप्पा व्यापक होता आणि तो थेट फोटोग्राफीच्या शोधाशी संबंधित होता. त्यानंतरच्या छायाचित्रकारांनी नायगारा धबधबा, इजिप्शियन पिरॅमिड अशा दूरवरच्या, अनोळखी ठिकाणांची दृश्ये टिपण्याचे काम केले.
या निसर्गरम्य दृश्यांना व्यापक लोकप्रियता मिळाली. त्यावेळी कॅमेरा प्रामुख्याने निसर्गाची हुबेहूब नक्कल तयार करू शकणारे (diverse culture) माध्यम म्हणून वापरला जात होता. त्याचा परिणाम असा झाला, की ती छायाचित्रांना ‘पुराव्यां’चा दर्जा मिळाला. कॅमेऱ्याच्या या वैशिष्ट्यामुळे असा एक ठाम विश्वास निर्माण झाला, की कॅमेरा खोटे बोलत नाही. कॅमेऱ्यावरील हा विश्वास डॉक्युमेंटरी फोटोग्राफीला आधार देऊन गेला.
हेही वाचा :