01:01 आणि 11:11 मिनिटांचं रहस्य काय? वाचा, ज्योतिषशास्त्रानुसार या वेळेचं खास महत्त्व

भारतीय संस्कृतीत आणि ज्योतिषशास्त्रात वेळेला विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. (Read) शुभ कार्य, प्रवास किंवा एखादा मोठा निर्णय घेण्याआधी वेळ आणि मुहूर्त पाहणे ही आपली सवयच आहे. परंतु काही वेळा अशी एखादी विशिष्ट वेळ आपण घड्याळात पाहतो, जसं की 01:01 किंवा 11:11 आणि ती वारंवार आपल्या नजरेस पडते. हे योगायोग नसून यामागे एक खास आध्यात्मिक संदेश लपलेला असतो, असा विश्वास अनेक ज्योतिषशास्त्रज्ञ व्यक्त करतात.11:11 ही वेळ बहुतेकांना माहिती असते. असं मानलं जातं की यावेळी तुम्ही जर डोळे मिटून एखादी इच्छा केली, तर युनिव्हर्स ती ऐकतो आणि योग्य वेळ येताच ती पूर्ण करतो. ही वेळ अँजेलिक नंबर्सच्या दृष्टीने खूप पॉवरफुल मानली जाते. या क्षणी आपल्या अवचेतन मनाची शक्ती वाढलेली असते. त्यामुळे सकारात्मक विचार आणि इच्छांची स्पष्टता या वेळेत अत्यंत महत्त्वाची असते.

01:01 ही वेळ बघणं हे केवळ संख्यात्मक योगायोग नाही. “1” ही संख्या म्हणजे नवी सुरुवात, आत्मविश्वास, इच्छाशक्ती आणि धैर्य. जेव्हा तुम्ही ही वेळ पाहता, तेव्हा याचा अर्थ असा होतो की ब्रह्मांड तुमच्या मार्गदर्शनासाठी सज्ज आहे. ही वेळ तुम्हाला सांगते की, जर तुम्हाला ही वेळ वारंवार दिसत असेल,(Read) तर समजा की तुमचं जीवन बदलण्याच्या उंबरठ्यावर आहे. हा क्षण असा असतो जिथे तुमची आतली ऊर्जा आणि युनिव्हर्सचं समर्थन एकत्र येतं.

ही वेळ दिसली की काय करावं? :
-थोडा वेळ थांबा
– डोळे मिटा
– मनात एक सकारात्मक इच्छा धरा
– युनिव्हर्सवर पूर्ण विश्वास ठेवा

हे काही सेकंद तुमच्या जीवनात मोठा फरक घडवू शकतात.(Read) तुमचे विचार जितके स्पष्ट, तितका प्रभाव अधिक.या वेळा कोणत्याही अपघाताने घडत नाहीत. त्या एक संदेश घेऊन येतात जागृत व्हा, स्वतःवर विश्वास ठेवा, आणि जगाच्या ऊर्जेशी एकरूप व्हा. ज्योतिषशास्त्र सांगतं की ब्रह्मांड सतत आपल्याला इशारे देत असतं. त्यातली 01:01 आणि 11:11 ही वेळ त्या संकेतांपैकीच एक आहे.

हेही वाचा :