गव्हाचं की नाचणीचं थालिपीठ? जाणून घ्या कोणतं आरोग्यासाठी उत्तम!

गव्हाचं थालिपीठ आणि नाचणीचं थालिपीठ दोन्ही मराठी स्वयंपाकघरात लोकप्रिय आहेत.(cuisine) मात्र आरोग्याच्या दृष्टीने कोणतं अधिक फायदेशीर आहे, हे जाणून घ्या

गव्हाचं थालिपीठ हे पचायला हलकं असून ऊर्जा देणारं असतं

यात फायबर आणि बी-व्हिटॅमिन्स असतात. परंतु, नाचणीचं थालिपीठ हे कॅल्शियम, लोह आणि अँटीऑक्सिडंट्स मध्ये खूप समृद्ध आहे.

नाचणी मधुमेह असणाऱ्यांसाठीही योग्य पर्याय मानली जाते, कारण ती ब्लड शुगर (cuisine) लेव्हल नियंत्रित ठेवते.

वजन कमी करणाऱ्यांसाठी आणि हाडं बळकट ठेवण्यासाठी नाचणीचं(cuisine) थालिपीठ अधिक उपयुक्त ठरू शकतं.

तर, गव्हाचं थालिपीठ हे दैनंदिन आहारात एनर्जी देण्यासाठी उत्तम!

गव्हामध्ये कार्बोहायड्रेट्स अधिक प्रमाणात असतात,(cuisine) त्यामुळे दिवसभरासाठी ऊर्जा मिळते.

ग्लायसेमिक इंडेक्स तुलनेत थोडा जास्त असल्याने मधुमेहींनी मर्यादित प्रमाणात सेवन करावं.

तर रक्ताची कमतरता असणाऱ्यांसाठी नाचणी उपयोगी असते.

तसेच नाचणी शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत.

दोन्ही थालिपीठांमध्ये तुम्ही भरपूर भाज्या (कांदा, मेथी, पालक, गाजर) घालून त्याची पौष्टिकता वाढवू शकता. सोबत लसणाची चटणी, लोणचं किंवा ताक दिल्यास पचनासाठीही फायदेशीर ठरतं.

हेही वाचा :