पुरुषांची उंची महिलांपेक्षा नेहमीच का जास्त असते? अखेर नव्या संशोधनातून सापडलं उत्तर

अनेकजण त्यांच्या उंचीबाबत अस्वस्थ असतात. अनेकदा यावरून तुलना होतानाही दिसते.(research) उंचीवरून काही जणांची खिल्ली देखील उडवली जाते. बहुतेक वेळा आपण बघतो की, पुरुषांची उंची स्त्रियांपेक्षा जास्त असते. पण तुम्ही कधी विचार केलाय का असं का होतं? ही नुसती योगायोगाची गोष्ट आहे की यामागे खरोखर काही शास्त्रीय कारण आहे?अमेरिकेतील गीसिंगर कॉलेज ऑफ हेल्थ सायन्सेस पेनसिल्वेनियामध्ये यासंदर्भात एक संशोधन करण्यात आलं. या संशोधनाच्या माध्यमातून या उंचीतील फरकाचं वैज्ञानिक कारण समोर आलं आहे. विशेषतः SHOX नावाच्या एका विशिष्ट जीनबद्दल यामध्ये माहिती देण्यात आली आहे. हे जीन पुरुष आणि महिलांच्या उंचीतला फरक ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं.

या संशोधनात 1225 लोकांच्या आरोग्यविषयक डेटाचं विश्लेषण करण्यात आलं. यात असं लक्षात आलं की SHOX नावाचा जीन, जो Y क्रोमोसोमवर अधिक एक्टिव्ह असतो. तो पुरुषांना सरासरी ३ सेंटीमीटरने अधिक उंच करतो. कारण Y क्रोमोसोम फक्त पुरुषांमध्येच असतो. महिलांमध्ये तो नसल्यामुळे, त्यांच्या शरीरावर SHOX चा फारसा प्रभाव पडत नाही. (research) म्हणूनच स्त्रियांची उंची तुलनात्मकदृष्ट्या पुरुषांपेक्षा कमी असते.शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, पुरुष आणि स्त्रियांच्या उंचीमधील सरासरी फरक १२ ते १४ सेंटीमीटर असतो. या पैकी सुमारे २२.६% फरक फक्त SHOX जीनमुळे निर्माण होतो. जर आपण दुसरी कारणं पाहिली तर हार्मोनचे बदल, आहार, आईवडिलांची उंची, आणि जीवनशैलीसारखे पर्यावरणीय घटक यांचाही फरक पडतो. याशिवाय पोषण, झोपेचा दर्जा, व्यायाम, किंवा अगदी जिथे आपण राहतो ती हवामानाची स्थिती यांचा देखील परिणाम होतो.

संशोधकांचं म्हणणं आहे की, SHOX जीनवर अधिक संशोधन केल्याने भविष्यात उंची वाढवण्याचे उपाय किंवा उपचार विकसित करता येऊ शकतात.(research) केवळ उंचीच नाही, तर या जीनच्या अभ्यासामुळे अल्झायमरसारख्या काही न्यूरोलॉजिकल आजारांचं कारण आणि संभाव्य उपचार देखील समजून घेता येतील.

हेही वाचा :