नव्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या सुरुवातीलाच 1 जुलै 2025 पासून देशात 7 महत्त्वाचे नियम(rules ) बदल झाले आहेत. या नव्या नियमांचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर आणि खर्चावर होणार आहे. रेल्वे तिकीट आरक्षण, क्रेडिट कार्ड पेमेंट, LPG सिलेंडरच्या किंमती, पॅनकार्ड नोंदणीसह अनेक गोष्टींमध्ये बदल झाला आहे. जाणून घ्या काय आहेत हे महत्त्वाचे बदल…

क्रेडिट कार्ड पेमेंटमध्ये बदल :
आरबीआयच्या नव्या नियमांनुसार, आता सर्व बँकांचे क्रेडिट कार्ड बिल पेमेंट फक्त भारत बिल पेमेंट सिस्टम (BBPS) द्वारेच करता येणार आहे. त्यामुळे क्रेड, फोनपे, बिलडेस्कसारख्या प्लॅटफॉर्मवर याचा परिणाम होणार असून, वापरकर्त्यांना पेमेंट पद्धतीत बदलाचा अनुभव येईल.
नवीन पॅन कार्डसाठी आधार अनिवार्य :
आता नवीन पॅन कार्ड बनवण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. पूर्वी इतर वैध ओळखपत्रांवर पॅन बनवता येत होते, मात्र सीबीडीटीच्या नव्या नियमांनुसार आधार व्हेरिफिकेशन शिवाय पॅन मिळणार नाही.
कमर्शियल LPG सिलेंडर स्वस्त :
दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसह अनेक शहरांमध्ये कमर्शियल LPG सिलेंडरच्या किमतीत 57 ते 58 रुपयांची घट झाली आहे(rules ). ही सलग चौथी वेळ आहे की सिलेंडर दरात कपात झाली असून हॉटेल्स, ढाबा चालकांसाठी मोठा दिलासा आहे.
UPI चार्जबॅक नियम शिथिल :
आतापर्यंत UPI चार्जबॅक क्लेमसाठी बँकांना NPCI कडून परवानगी घ्यावी लागत होती, मात्र आता बँका स्वतःहून चार्जबॅक क्लेम पुन्हा प्रोसेस करू शकणार आहेत. यामुळे ग्राहकांना तक्रारीवर वेगाने प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
रेल्वे आरक्षण चार्ट वेळेत बदल :
आधी रेल्वे चार्ट चार तास आधी तयार होत असे, आता तो आठ तास आधीच तयार होणार आहे. त्यामुळे वेटिंग लिस्टमधील प्रवाशांना योजना आखण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे.

GST रिटर्नमध्ये कडक नियम :
GSTR-3B फॉर्म आता एडिट करता येणार नाही. तसेच, तीन वर्षांनंतर मागील तारखेचा GST रिटर्न भरता येणार नाही, असे जीएसटी नेटवर्ककडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना वेळेत परतावे सादर करावे लागतील.
जेट इंधन दरात 7.5% वाढ :
घरगुती विमानप्रवासासाठी वापरल्या जाणाऱ्या जेट इंधनाच्या किमतीत 7.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. फक्त दिल्लीमध्येच इंधनाचे दर 6,271 रुपयांनी वाढून 89,344.05 रुपये प्रति किलोलीटर झाले आहेत. याचा परिणाम विमान तिकिटांच्या दरांवर आणि प्रवाशांच्या खिशावर होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :