प्रसिद्ध उद्योगपती आणि अभिनेत्री (actor )करिश्मा कपूर यांचे पूर्व पती संजय कपूर यांचं निधन १२ जून २०२५ रोजी लंडनमध्ये पोलो खेळताना झालं. मधमाशी चुकून गिळल्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि त्यातूनच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या निधनानंतर तब्बल आठ दिवस उलटले, तरीही त्यांच्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया रखडली होती. त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला होता.
आता संजय कपूर यांच्या कुटुंबीयांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. संजय कपूर यांच्यावर १९ जून रोजी नवी दिल्लीतील लोधी रोड स्मशानभूमीत संध्याकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत(actor ). कुटुंबीयांनी प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटमधून हे स्पष्ट करण्यात आलं आहे.
कायदेशीर अडचणींमुळे मृतदेह आणण्यास विलंब :
संजय कपूर यांचं निधन युनायटेड किंगडममध्ये झालं असून त्यांचं अमेरिकन नागरिकत्व असल्यामुळे त्यांचा मृतदेह भारतात आणण्यासाठी काही महत्त्वाच्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण कराव्या लागल्या. हाच मुख्य कारण ठरला की त्यांच्या अंत्यसंस्कारात आठ दिवसांचा विलंब झाला. संबंधित कागदपत्रे आणि दूतावासाच्या परवानग्या मिळवण्यात काही वेळ लागला.
या पार्श्वभूमीवर, संजय कपूर यांना दिल्लीतच अंतिम निरोप दिला जाणार असून, २२ जून रोजी ताज पॅलेस हॉटेल, दिल्ली येथे सायंकाळी ४ ते ५ या वेळेत प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे. करिश्मा कपूर आपल्या दोन्ही मुलांसह या अंत्यसंस्कारास उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
मृत्यूच्या क्षणांपूर्वी संजय कपूर यांनी काय सांगितलं? :
मीडिया रिपोर्टनुसार, पोलो खेळताना अचानकपणे त्यांच्या तोंडात मधमाशी गेली आणि ती त्यांनी गिळली. त्यानंतर त्यांना श्वास घेण्यास अडथळा येऊ लागला. मृत्यूच्या काही क्षणांपूर्वी त्यांनी, “मी काहीतरी गिळलं आहे,” असं सांगितलं होतं. त्यानंतर तातडीने वैद्यकीय मदत मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
संजय कपूर यांचं निधन केवळ ५३ व्या वर्षी झालं असून, त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबीय आणि जवळच्या मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे. त्यांची जीवनशैली, करिअर आणि कौटुंबिक नाती यामुळे ते अनेकदा चर्चेत होते.
कुटुंबात कोण-कोण आहे? :
संजय कपूर यांच्या पश्चात त्यांची पत्नी प्रिया सचदेव, आई राणी सुरिंदर कपूर आणि एकत्रित चार मुलं आहेत(actor ). त्यांना करिश्मा कपूरपासून समायरा नावाची मुलगी आणि कियान नावाचा मुलगा आहे. प्रिया सचदेवच्या पहिल्या लग्नातील मुलगी सफिरा देखील त्यांच्यासोबत राहते. शिवाय संजय आणि प्रियाला एक ६ वर्षांचा मुलगाही आहे.
त्यांच्या अशा अकाली जाण्याने एक यशस्वी उद्योजक, एक कुटुंबवत्सल पिता आणि सामाजिक वर्तुळात ओळख असलेल्या व्यक्तीचा अचानक अंत झाला आहे. त्यांच्या आठवणींना श्रद्धांजली वाहण्यासाठी देशभरातून लोक दिल्लीतील प्रार्थना सभेत उपस्थित राहतील अशी शक्यता आहे.
हेही वाचा :