बायको भांडून माहेरी गेली नराधम बापाकडून ११ वर्षीय पोटच्या चिमुकलीवर अत्याचार

बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस(house) वाढ होत असल्याचं चित्र आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या, माजलगावात भरदिवसा बाबासाहेब आगे यांच्यावर झालेला हल्ला, आणि आता बीडच्या नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत समोर आलेली एक अत्यंत संतापजनक घटना.बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे आपली तळ पायाची आग मस्तकात जाईल. एका नराधम बापाने आपल्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. याप्रकरणी पीडितेच्या आईने नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

बीडमधील नेकनूर येथील एका गावात एक जोडपे राहत आहे. त्यांना ११ वर्षांची मुलगी देखील आहे. पती आणि पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. वाद (house)विकोपाला गेला. त्यानंतर पत्नी संतापून पुण्याला निघून गेली. मात्र ती एकटीच गेली. आई आपल्या मुलीला घेऊन गेली नाही. मुलगी बापासोबत एकटीच राहत होती.
शुक्रवारी रात्री राहत्या घरात नराधम पित्याला दुर्बुद्धी सुचली. त्याने घरातच पोटच्या मुलीवर अत्याचार केला.

पीडित मुलीची आई पुण्याहून परतली. तेव्हा मुलीने बापाने केलेल्या दुष्कृत्याची माहिती दिली. याची माहिती मिळताच आईच्या पाया खालची वाळू सरकली. तिला संताप (house)अनावर झाला. पीडित मुलीच्या आईने थेट नेकनूर पोलीस ठाणे गाठले. तसेच नराधम पित्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी नराधम पित्याविरोधात तक्रार नोंदवून घेत तपास करत आरोपीला अटक केली. आरोपी नेकनूर पोलिसांच्या ताब्यात असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा :

अभिनेत्रीने भर रस्त्यात टी शर्ट काढून अस काही केलं की video viral

ऊसाचा रस किती वेळ फ्रेश राहतो? काढल्यावर कधीपर्यंत प्यायला हवा

महाराष्ट्रात हे चाललंय काय भररस्त्यात रिक्षा चालक महिलेसमोर नग्न झाला आणि