मेष – गुरुपौर्णिमेसारखा सुंदर दिवस आज आपल्याला वेगळे आशीर्वाद देऊन जाणार आहे. दत्तगुरूंची उपासना विशेष फलदायी ठरेल.(beautiful) अनेक दिवस मनामध्ये रेंगाळत असणाऱ्या गोष्टी सत्यात उतरताना आज दिसून येईल.
वृषभ – कधी कधी आपण अनेक गोष्टी धडाडीने केलेल्या आहेत. पण तशा गोष्टींचे विशेष लाभ आपल्याला मिळाले नाहीत. आजही काही अडचणी पुढे उभे ठाकतील. पण दिवसाच्या शेवटी सगळ्यावर मात करून यश मिळणार आहे. धनयोग उत्तम आहेत.
मिथुन – व्यावसायिक भागीदारांबरोबर नव्याने बैठका होतील. व्यवसाय वृद्धीसाठी पुढील आखणी केली जाईल. पैसे (beautiful)खर्च होतील पण त्यामधून पुढील कामाची नव्याने पाया रोवला जाईल.
कर्क – हाताखालील लोकांकडून विशेष सहकार्य मिळेल. एकमेकांना समजून घेऊन जवळच्या लोकांबरोबर दिवस व्यतीत करावा लागेल. मनाची घालमेल होईल पण आपल्या निर्णय पक्का ठेवून पावले उचला.
सिंह – आज व्यासपौर्णिमा आहे. आयुष्यामध्ये ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले आहे त्यांच्या प्रती शरणागत भाव ठेवा. कुठलाही अहंकार न ठेवता केलेल्या गोष्टी आज कारणे रास्त राहील. धनयोग उत्तम आहेत.
कन्या- गुरु रूप व्यक्तींचे घरी आगमन होईल. पाहुण्यांची मांदियाळी राहील. छोटेखानी धार्मिक कार्यक्रम आज घरी घडेल. व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने विशेष निर्णय आज घेतले जातील.
तूळ – व्यापारामध्ये एक वेगळी उमेद असेल. शेजारील व्यक्तींचे सहकार्य मिळेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. जवळच्या प्रवासातून फायदा दिसतो आहे.
वृश्चिक – घरामध्ये आनंदी वातावरण राहील. आपण काही मोठ्या जबाबदाऱ्या अंगावर घेतल्या असतील तर आज त्या पार (beautiful)पडल्या जातील. जोडीदाराच्या तब्येतीची आज काळजी घ्यावी लागेल.
धनु – सकारात्मक असे वलय आपल्या भोवती आज असेल. आपला इतरांना आधार वाटेल. तुमचे समुपदेशन याच्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात नवीन उर्मी दाटेल. दिवस उत्तम आहे. गुरुकृपा विशेष लाभणार आहे.
मकर – मोठ्या उड्या, मोठ्या आकांक्षा आकांक्षा जर ठेवल्या असतील तर त्याच्यासाठी आज थोडा वेळ देण्याची गरज आहे. हॉस्पिटलायझेशनचे योग आहेत. मनोबल संयमित ठेवावे लागेल.
कुंभ – जुन्या लोकांचा गाठीभेटी होतील. त्या आठवणी मधून मनाला ताजेतवाने पण मिळून जाईल. आजपर्यंत केलेल्या गोष्टींचा योग्य तो मोबदला मिळण्याचा आजचा दिवस आहे. समजून-उमजून कामात व्यस्त रहाल.
मीन – सामाजिक पद प्रतिष्ठा पैसा या गोष्टींकडे आज तुमचा विशेष कल राहील. तुमच्या गुरूंचे आशीर्वाद तुम्हाला विशेष आहेत काळजी करण्याचे कारण नाही. व्यवसायामध्ये भरभराट होईल. दिवस सुखद आहे.
हेही वाचा :