अजित पवारांच्या आरोपावर रोहित पवारांचा मोठा खुलासा

रोहित पवार राजकारणात येण्यासाठी इच्छुक असताना त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता, असा खुलासा अजित पवार यांनी निवडणूक प्रचारात केला होता. रोहितला जेव्हा निवडणुकीत येयचं होतं. तेव्हा शरद पवारांचा विरोध होता. बारामती अँग्रो सांभाळा, असं शरद पवारांकडून सांगण्यात आलं होतं. मात्र, त्यावेळी मला माहिती मिळाली की, रोहित पवार अपक्ष निवडणूक लढणार होते. मात्र मीच त्यांना एबी फॉर्म दिला अन् त्याला जिंकवून आणलं असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. रोहित पवारांना हडपसरमधून निवडणूक लढवायची होती. मात्र, त्यांना कर्जत जामखेडला निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला होता, असंही अजित पवार म्हणाले होते. त्यावर आता रोहित पवारांनी अजित पवारांचे आरोप फेटाळवले आहेत.

काय म्हणाले रोहित पवार?

कदाचित अजितदादांचं माझ्यावर प्रेम असेल, पण काका म्हणून माझं प्रेम त्यांच्यावर आहे. दोन वर्ष कर्जत जामखेडमध्ये मी काम करतोय. जिथं काम करायला मिळेल असा मतदारसंघाचा शोध घेतला मी काम केलं. पवार साहेबांनी अवघड मतदारसंघ शोधायला लावलं होतं. मला अजित पवार यांची निवडणुकीत निवडून येण्यास मदत झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारे कारखाना कर्जत जामखेडला आहे. त्याचाही फायदा झाला. मला एबी फॉर्म दिला होता. मी कधी अपक्ष निवडणूक लढणार नव्हतो, असा खुलासा रोहित पवार यांनी केला आहे. मला अजितदादांनी काम करायला सागितलं. दादा 50 टक्के खरं आणि 50 टक्के बोलत आहेत, असं प्रत्युत्तर अजित पवार यांनी दिलंय

भाजप एक वायरस आहे तो अजित पवार यांना लागला आहे. 10  दिवसानंतर अजित पवार यांच भाषण मोदी शहासारखं होतील. एकवेळ ते म्हणतील शरद पवार मुख्यमंत्री होते की नाही? अशा गोष्टीने दादांवरचा विश्वास लोकांचा कमी होईल, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे. रोहित पवार यांनी यावेळी पार्थ पवार यांच्यावर सुरक्षाव्यवस्थेवर देखील टीका केली.

पार्थ पवारांना खूप कमी दर्जाची सिक्युरिटी दिलेले आहे. पंतप्रधान यांना जी  सिक्युरिटी वापरली जाते ती सिक्युरिटी द्यायला पाहिजे होती. काही विश्लेषक याबद्दल वेगळ्या अर्थाने बोलत आहेत. मधोमध गाडी असते दोन्ही बाजूला दोन गाड्या असतात या इलेक्शनमध्ये जो पैसा वापरला जाणार आहे, या इलेक्शनचा पैसा या गाड्यामधून जाईल की काय? असं शंका व्यक्त केली जाते, असं रोहित पवार म्हणाले. सिक्युरिटी गाड्या एका राजकीय व्यक्तीच्या मुलाला दिल्या जात असतील तर अनेक शंका निघू शकतात, असं म्हणत रोहित पवार यांनी टीका केली आहे.

दरम्यान, भाजप हुशार पक्ष आहे. सभा कुठे मोदी शहा कुठे याची घ्यायची हे ठरवतात. अजित दादांना वाटत बारामतीमध्ये सभा व्हावी. मात्र भाजप मित्र पक्षाचा उमेदवार कधी निवडूनच येणार नाही, त्याठिकाणी मोदी सभा घेत नाही. महायुती उमेदवार पडणारच आहे तर मोदी साहेबांचं रिपुटेशन खराब होऊ शकतो. आज पुण्यात रवींद्र धंगेकर भाजप उमेदवारापेक्षा काही थोडक्या मताने पुढे आहेत ते पुढे जात आहेत त्यांना वाटतं ते कमी करण्यासाठी मोदी सभा घेत आहेत, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.