शिंदेंच्या हातून नाशिक निसटलं? जागा दादांना फिक्स, धाराशिवलाही राष्ट्रवादीचा उमेदवार फायनल

नाशिक आणि धाराशिवच्या जागेबाबत महायुतीतील (alliance)तिढा अखेर सुटण्याच्या मार्गावर आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. कारण नाशिकची जागा राष्ट्रवादीला सुटणार असल्याची माहिती आहे. यासोबतच धाराशिव अर्थात उस्मानाबाद लोकसभाही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याची शक्यता आहे.

विक्रम काळे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेवरील आमदार आहेत. ते मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. विक्रम काळेंनी आज सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देवगिरी निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पत्रकार परिषद घेऊन नाशिक आणि धाराशिवच्या (alliance)उमेदवारांच्या घोषणा करण्याची शक्यता आहे. धाराशिववर महायुतीतील तिन्ही पक्षांनी दावा केल्यामुळे मोठा तिढा निर्माण झाला होता. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत या मतदारसंघासाठी रस्सीखेच सुरु होतीच, पण भाजपही या जागेसाठी उत्सुक होतं.

भाजपकडून सेवानिवृत्त आयएएस अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांच्या नावाची चर्चा होती. परंतु परदेशींना ‘घड्याळ’ चिन्हावर लढण्याची अट घालण्यात आली होती. मात्र ते ‘कमळ’ चिन्हासाठीच आग्रही असल्याने काळेंना संधी दिल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचा:

पोलिसांनी एकाला ठोठावला तब्बल 36 हजारांचा दंड; Reel बनवत असाल तर…

अखेर जान्हवीच्या होण्याऱ्या नवऱ्याबाबत बोनी कपूर यांचा खुलासा, म्हणाले…

राजारामपुरी पोलीस ठाणेच्या टीमने संरक्षीत “घुबड” वन्य पक्ष्याची तस्करी रोखूण संशयीतास मोटर सायकल सह घेतले ताब्यात