पोलिसांनी एकाला ठोठावला तब्बल 36 हजारांचा दंड; Reel बनवत असाल तर…

सध्या रील्स बनवण्यासाठी अनेक जण काहीही स्टंट करताना दिसून येतात (police). अशातच एका व्यक्तीला 36,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. एका इंस्टाग्राम रीलसाठी या व्यक्तीने रस्त्याच्या मधोमध आपली कार थांबवून वाहतूक विस्कळीत केली होती. अनेकजण सोशल मिडीयावर फेमस होण्यासाठी अनेक जण स्टंट करतानाचे रील शेअर करत असतात.

फेमस होण्याच्या प्रयत्नात अनेकदा त्यांना मोठा फटका देखील बसतो (police). अशाच काहीसा प्रकार समोर आला आहे. दिल्ली वाहतूक पोलिसांनी एका व्यक्तीला 36,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. एका इंस्टाग्राम रीलसाठी या व्यक्तीने रस्त्याच्या मधोमध आपली कार थांबवून वाहतूक विस्कळीत केली होती. दरम्यान, प्रदीप ढाका असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती.

पोलिसांनी वाहनही जप्त केले असून प्रदीप ढाकाविरुद्ध मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे (police). प्रदीप ढाका यांनी गर्दीच्या वेळी दिल्लीच्या पश्चिम विहारमधील उड्डाणपुलावर स्वतःची कार थांबवल्याचा व्हिडिओ अपलोड केला होता. या रीलमध्ये ते दरवाजा उघडा ठेवून कार चालवतानाही दिसले. शिवाय, प्रदीप ढाका यांनी पोलिसांच्या बॅरिकेड्सला आग लावली आणि व्हिडिओ अपलोड केला.

दिल्ली पोलिसांनी प्रदीप ढाका यांच्यावर केलेल्या कारवाईची माहिती देणारा एक व्हिडिओ त्याच्या एक्स प्रोफाइलवर पोस्ट केला आणि त्याची कार कशी जप्त करण्यात आली आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला हे देखील सांगितले. पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी त्याला भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रदीप ढाकाने आपल्या सोशल मीडिया स्टंटसाठी जी कार वापरली ती त्याच्या आईच्या नावावर नोंदणीकृत होती. पोलिसांना वाहनात प्लास्टिकची काही बनावट हत्यारेही सापडली.

हेही वाचा:

अरविंद केजरीवाल यांनी ईडीच्या तुरुंगातून दिल्या ६ गॅरंटी

बागेश्वर बाबांना 4 वाजेपर्यंत अटक करा, अन्यथा कायदा व्यवस्था बिघडू शकते

कार गरागरा फिरली अन् ड्रायव्हर थेट आकाशात; रोहित शेट्टीचा चित्रपटही ठरेल फेल