अजित पवार :‘सुर्य चंद्र आहे तोपर्यंत बाबासाहेबांच्या संविधानाला कोणी बदलू शकत नहीं

 लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून जोरदार प्रचार केला जात आहे. नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्मसाठी भाजपकडून अथक प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, भाजपच्या अनेक नेत्यांकडून संविधान बदलण्याची भाषा बोलली जात आहे. संविधान बदलण्यासाठी 400 पार करावे लागणार आहेत. त्यासाठी मोदींना मत द्या असे आवाहन भाजपच्या इतर राज्यातील उमेदवारांनी केली आहेत. यावरुन महाविकास आघाडीने महायुतीवर निशाणा साधला. यावर आता महायुतीमध्ये सामील झालेल्या अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत बाबासाहेबांच्या संविधानाला कोणी धक्का लावू शकत नाही असेे वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे.

इंदापूर शहरातील राधिका हॉल येथील वकील व व्यापाऱ्यांच्या बैठक ते बोलत होते. अजित पवार म्हणाले, घटनेमध्ये किरकोळ दुरुस्त्या कराव्या (अमेंडमेंट) लागतात. जवाहरलाल नेहरू यांच्यापासून आतापर्यंत १०६ वेळा अमेंडमेंट केली गेली.असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. यावेळी आमदार दत्तात्रय भरणे, आमदार यशवंत माने,प्रदीप गारटकर, प्रवीण माने, शशिकांत तरंगे, प्रतापराव पाटील, हनुमंत कोकाटे, श्रीमंत ढोले, सचिन सपकळ,ॲड. माधव शितोळे,ॲड. कृष्णाजी यादव, ॲड.शरद जामदार, नंदकुमार गुजर, संदीप वाशिंबेकर, ॲड. लक्ष्मण शिंगाडे, ॲड. प्रकाश वाघमोडे यांच्यासह व्यापारी, वकील व महायुतीतील विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्येकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे अजित पवार म्हणाले, “मोदींनी मागास आयोग नेमण्याकरिता आणि महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याकरिता दुरुस्ती केली हे चुकीचे आहे का? महिला संधी दिल्यानंतर सोनं करू शकतात, हे आपण बघितलेले आहे. त्यामुळे कारण नसताना बदनामी केली जात आहे.शेवटची निवडणूक असून हुकूमशाही येणार असल्याचे सांगितले जात आहे. लोकशाहीमध्ये मते मांडण्याचा अधिकार आहे म्हणून चिखल फेक करून काही आरोप करणार का?” असे म्हणत अजित पवार यांनी खरं तेच सांगा असे विरोधकांना सुनावले.