जागतिक सौंदर्य स्पर्धेत अकोल्याचा डंका!

जागतिक स्तरावर सौंदर्य स्पर्धेत मोठा मान असलेल्या ‘द ग्लोबल ब्युटी अवॉर्ड्स’मध्ये मराठी मोहोर उमटली आहे. मुळची अकोल्याची मात्र, आता अमेरिकन नागरिक असलेल्या गार्गी खोडे या 17 वर्षीय सौंदर्यवतीने ‘मोस्ट फोटोजेनिक फेस गटा’त विजेतेपद पटकावलं आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यातल्या स्नोकॉलीमी शहरात रविवारी ही स्पर्धा पार पडली. अंतिम फेरीतील एकूण 11 सौंदर्यवतींमधून तिची निवड झालीआहे. याआधी 400 सौंदर्यवतींमधून 11 जणींची अंतिम फेरीकरीता निवड करण्यात आली होती. तिचे वडील रविंद्र खोडे हे व्यवसायानिमित्ताने अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. याआधी तिने ‘मीस रेडमंड टीन वॉशिंग्टन स्टेट’, मीस टीन ग्लोबल एशिया इंडिया असे किताब पटकावले आहेत. तिच्य् या यशाबद्दल अकोलेकरांनीही आनंद व्यक्त केला आहे.

400 सौंदर्यवतींमधून गार्गीच्या शिरावर विजेतेपदाचा ‘मुकूट’
‘मराठी पाऊल पडते पुढे’ असं म्हटलं जातं. याचाच प्रत्यय आला आहे अमेरिकेत नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा ‘द ग्लोबल ब्युटी अवॉर्ड्स मध्ये. मूळची अकोल्याचे असलेल्या 17 वर्षीय गार्गी खोडे हने या स्पर्धेतील ‘मोस्ट फोटोजेनिक फेस’ या प्रकारात यश आणि कर्तुत्वाचा झेंडा रोवला आहे या स्पर्धेत तिने फक्त स्वतःच्या नावाची नोंदच केली नाही तर भारतीयांसाठी एक महत्त्वाचा टप्पाही गाठला आहे. या स्पर्धेत नामांकन आणि पुरस्कार मिळवणारी गार्गी पहिलीच भारतीय मूळ असलेली किशोरवयीन सौंदर्यवती आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जागतिक स्तरावर भारतीय सौंदर्याचा गौरव झाला आहे. जगभरातील विविध देशातल्या सौंदर्यवती या स्पर्धेत सहभागी होतात. या स्पर्धेत एकुण 400 सौंदर्यवतींमधून ‘मोस्ट फोटोजेनिक फेस’ या गटात अंतिम फेरीसाठी 11 सौंदर्यवतींची निवड करण्यात आली होती. त्यात गार्गी विजेती ठरली.

The Global Beauty Awards : जागतिक सौंदर्य स्पर्धेत अकोल्याचा डंका!’द ग्लोबल ब्युटी अवॉर्ड्स’मध्ये ‘मोस्ट फोटोजेनिक फेस’ गटात गार्गी खोडे विजेती

अमेरिकेतील अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये गार्गीची बाजी!
गार्गीच्या यशाचा प्रवासा अविरत उत्साह आणि समर्पणाची कथा सांगणार आहे. 2022 मध्ये तिला ‘मीस रेडमंड वॉशिंग्टन युनायटेड स्टेट’चा किताब मिळाला. या किताबातून तिने आपल्या भविष्यातील यशाची पायाभरणी केली. 2023 मध्ये तिने मेनका सोनी यांच्या ‘एम्पॉवरिंग नॉन प्रॉफिट संस्थेद्वारे आयोजित केलेल्या ‘मिस टीन ग्लोबल एशिया इंडिया 2023’ हा किताब जिंकला.

गार्गीने ‘ग्लोबल ब्युटी अवॉर्ड्स’मध्ये नुकताच मिळवलेला पुरस्कार हा तिच्यातील फोटोजनिक आकर्षणासोबतच प्रेक्षक आणि परीक्षकांना आपल्या सौंदर्यासह बुद्धीच्या क्षमतेचा पुरावा देणार आहे. तिच्या या आगळ्या-वेगळ्या यशाचा तिच्या वडिलांची जन्मभूमी असलेल्या अकोल्यात मोठा आनंद झाला आहे.

गार्गीने मानले आई-वडिलांचे आभार
गार्गीला सौंदर्य स्पर्धेत सहभागासाठी तिच्या आई-वडिलांनी प्रोत्साहन दिलं. गेल्या दोन वर्षांत तिने विविध सौंदर्य स्पर्धांमध्ये आपल्या आई-वडिलांच्या प्रोत्साहनाने सहभाग घेतलाय. ‘द ग्लोबल ब्युटी अवॉर्ड्स’मध्ये यश मिळविल्यानंतर तिने उपस्थितांना संबोधित करतांना आपल्या आई-वडिलांचे आभार मानले आहेत.

संबंधित बातम्या

Akola News : प्रसंगावधान राखत रेल्वे पोलिसांनी वाचवले दोघांचे प्राण; चालती ट्रेन पकडणं आलं असतं अंगलट, पण…