धक्कादायक !शिक्षिकेच्या पतीने केला मुख्याध्यापकावर हल्ला,

बिवलीत घडलेल्या एका घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. शिक्षिकेचे खाते पुस्तक रोखून धरल्याने प्रमोशन होत नाही, या रागातून शिक्षकेच्या पतीने थेट मुख्याध्यापकावरच प्राणघातक हल्ला केला आहे.

डोंबिवली ते खारबाव रेल्वे स्थानकादरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवर ही घटना घडली. या हल्ल्यात मुख्याध्यापक भागवत गुरव जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डोंबिवली रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करत हल्लेखोर शकील हुमायून शेख याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील एका शाळेत मिनाझ मकानदार शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. तर याच शाळेत भागवत गुरव हे मुख्याध्यापक आहेत. खाते पुस्तक पूर्ण केल्याचा अभिप्राय नोंदवला नसल्याने मिनाझ यांची पगारवाढ होत नसल्याचा आरोप मिनाझ यांच्याकडून केला जात होता.

मिनाझ आणि मुख्याध्यापक भागवत गुरव यांच्यात नेहमी वाद होत हाेता. अनेक वेळा विनंती करुन देखील शमिना शेख यांची विनंती मान्य केली जात नव्हती. त्यांनी हा प्रकार पती शकील यांना सांगितला. मिणाझ यांचे पती शकील शेख आपल्या पत्नीला पगारवाढ रोखून त्रास देत असल्याच्या रागातून मुख्याध्यापक गुरव यांच्यावर संतापले होते. शिक्षिकेचा पती शकील शेख याने मुख्याध्यापक भागवत गुरुव यांना खारबाव रेल्वे स्टेशनजवळ रुळाजवळ गाठले. तूला जीवंत सोडणार नाही, असे म्हणत त्यांच्यावर धारदार हत्याराने हल्ला करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

या हल्ल्यात मुख्याध्यापक गुरव गंभीर जखमी झाले. बेशुद्द अवस्थेत त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. खारबाव येथून कल्याणच्या खाजगी रुग्णालयात आणले आहे. गुरव हे कल्याणचे रहिवासी आहे. ते कल्याणहून खारबावला जातात. याची माहिती शकील याला आधीच होती. हल्ला गेल्यावर शकील पळून गेला होता. डोंबिवली जीआरपीने आरोपी शकील शेख याला अटक केली आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे