“……पक्षाबरोबर आमची अनेक दशकांची युती होती. ती टिकवायची म्हणून….”;पंतप्रधान मोदींचे परखड मत

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘एपी ग्लोबाले’ आणि एका प्रसिद्ध वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी शिवसेना उद्धव ठकारे पक्षाकडून होत असलेल्या वैयक्तीक टीकेबाबतही चर्चा झाली. त्यावर पंतप्रधानांनी ते वैय्यक्तिक टीकेला कधीही महत्त्व आणि प्रत्युत्तर देत नाहीत, असे सांगितले.

माझे कुटुंब आणि जातीवर कायमच अपशब्द

देशात असलेल्या माझ्या अनेक विरोधकांनी कायमच मला, माझ्या कुटुंबाला आणि माझ्या जातीसाठी कायमच अपशब्द वापरले आहेत. तसेच त्यांनी अनेकवेळा माझ्या कुटुंबाच्या सुरुवातीच्या काळातील परिस्थितीची थट्टा केली आहे. पण या सर्व गोष्टींचा माझ्यावर कोणताही परिणाम झाला नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

तेव्हाही हे लोक अत्यंत वाईट बोलत

पुढे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून होणाऱ्या टीकेवर थेट बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,” आमची या पक्षाबरोबर युती होती तेव्हाही हे लोक अत्यंत वाईट बोलत माझा अपमान करायचे. पण त्या पक्षाबरोबर आमची अनेक दशकांची युती होती. ती टिकवायची म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष करायचो आणि आजही मी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतोय.

शिवसेनेच्या फुटीवर आपले मत व्यक्त

यावेळी पंतप्रधानांनी कोणताही उल्लेख न करता शिवसेनेच्या फुटीवर आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, त्या पक्षाकडून माझ्यावर अनेक वर्षांपासून वैयक्तिक टीका होत आहे. हा सर्व प्रकार जनतेला आवडलेला नाही. तसेच त्या पक्षातील त्यांचे नेते, आमदार आणि खासदारांना हे पटले नाही. म्हणून या सर्वांनी आपले राजकारण बाळासाहेब ठाकरेंच्या मार्गावर आणले.