शांतिगिरी महाराजांनी भरला शिवसेना शिंदे गटाचा अर्ज

नाशिक मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारीच्या वादात सोमवारी नवा ट्विस्ट(political campaign strategies) आला आहे. शांतिगिरी महाराज यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या इच्छुकांना मोठा राजकीय धक्का बसला आहे.

महायुतीचा नाशिक मतदारसंघातील उमेदवार(political campaign strategies) कोण? यावरून गेले दोन आठवडे वाद सुरू आहे. मात्र अद्यापही उमेदवार ठरलेले नाही. उमेदवार ठरविण्याचे अंतिम प्रक्रिया सुरू आहे. अशातच शांतिगिरी यांनी सर्व राजकीय पक्ष आणि इच्छुकांना मोठा धक्का दिला आहे. शांतिगिरी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेना एकनाथ शिंदे गट असा अर्ज दाखल केला आहे. या अर्जासोबत पक्षाचा एबी फॉर्म जोडलेला नाही.

या संदर्भात शांतिगिरी महाराज यांचे समन्वयक अरुण शेठ पवार यांनी महाराजांनी आज शिवसेना शिंदे गटातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या संदर्भात आमची वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाली आहे. पक्षाने आम्हाला एबी फॉर्म देण्याचे मान्य केले आहे. येत्या एक-दोन दिवसांत पक्षाकडून एबी फॉर्म मिळेल. त्यामुळे आम्ही अर्ज दाखल केला असे सांगितले.

नाशिक मतदारसंघात युतीच्या उमेदवाराचा मोठा वाद आहे. विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी उमेदवारी मिळेल, असा दावा केला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांचा प्रचारदेखील सुरू आहे. मात्र, यावर महायुतीच्या घटक पक्षांमध्ये मोठा वाद आहे. या वादातूनच उमेदवारीचा निर्णय घेण्याचा विषय लांबला आहे. आज याबाबतची प्रक्रिया अपेक्षित आहे. त्याआधीच शांतिगिरी यांनी अर्ज दाखल केल्याने राजकीय कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. शांतिगिरी यांनी यापूर्वी शुक्रवारी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेला आहे.

शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनीदेखील शांतिगिरी यांच्या उमेदवारी अर्जाबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यांचे कोणाशी बोलणे झाले आणि काय चर्चा झाली, याबाबत आपल्याला कुठलीही माहिती नाही. आमचा उमेदवार तयार आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत याबाबतचा निर्णय होईल. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचा नाशिक मतदारसंघातील उमेदवार जाहीर होईल, असा दावा त्यांनी केला.

हेही वाचा :

पाकिस्तानने केली मोठी घोषणा; BCCI उचलणार  मोठं पाऊल?

आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क ‘सेक्स डॉल’..

पुढील 48 तासात मोदींच्या महाराष्ट्रात अर्धा डझन सभा! कोणासाठी, कुठे घेणार सभा?