कोल्हापूरच्या मंगळवार बंदबाबत घेतला मोठा निर्णय
कोल्हापूर शहराची(city) प्रलंबित असलेली हद्दवाढ तसेच खंडपीठ या मागण्यासाठी हद्दवाढ कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर येत असतानाच उद्या कोल्हापूर बंदची हाक देण्यात होती. तसेच रिक्षा, टॅक्सी चालकांचा विलंब दंड या विरोधात रिक्षा आणि टॅक्सी चालक उद्या (२५ जून) संपावर जात आहेत. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा कोल्हापूर दौरा रद्द झाल्याने हे कोल्हापूर बंदची हाक मागे घेत, स्थगित करण्यात आला आहे. मात्र रिक्षा आणि टॅक्सीचा संप सुरू राहणार आहे.
राज्यातील पहिली शाश्वत विकास परिषद कोल्हापूरातील सयाजी हॉटेल मधील विक्टोरिया सभागृहात मंगळवार २५ जून रोजी होणार आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ६ पर्यंत होणाऱ्या या परिषदेत जिल्ह्यातील उद्योग आयटी आणि पर्यटन क्षेत्राला गती देण्यासाठी सामंजस करार आणि चर्चा होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहणार होते. मात्र कोल्हापूर महानगरपालिका झाल्यापासून शहराची रखडलेली हद्दवाढ आणि कोल्हापुरात खंडपीठ व्हावे ही प्रलंबित असलेली मागणी, यासाठी शहर हद्दवाढ कृती समिती आक्रमक झाली आणि त्यांनी कोल्हापूर बंदची हाक होती.
बंदची हाक आणि संप यामुळे मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱ्याला विरोध होत असल्याचे दिसत होते. यामुळे मुख्यमंत्र्यांनी दौरा रद्द केला आणि ते शाश्वत विकास परिषदेला ऑनलाईन उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले. यामुळे शहर हद्दवाढ कृती समितीने उद्या दिलेली कोल्हापूर बंदची हाक मागे घेतली आहे. मात्र रिक्षा आणि टॅक्सीचा संप सुरू राहणार असून आज रात्री बारापासून ते उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हा संप सुरू राहणार आहे.
हेही वाचा :
देवावर विश्वास आहे का? विचारताच नाना पाटेकर म्हणाले, आठ आणे फेकून लाख रुपये मागायचे…
विषारी कोबराला शॅम्पूने आंघोळ, अचानक घातला मानेला विळखा..
सवालही पैदा नही होता’ म्हणणाऱ्या शरद पवारांनी शब्द फिरवला