देवेंद्र फडणवीसांच्या कोकणातील भाषणाची राज्यभर चर्चा
एकीकडे मोदीजी दुसरीकडे नारायण राणेजी हे कोकणच्या विकासाचं कॉम्बिनेशन आहे. मला निश्चित सांगायचं आहे की, नारायण राणे जगाच्या पाठीवर कुठेही असले तरी त्यांच्या डोळ्यासमोर नेहमी कोकण असतं. कोकणचा विकास हे ध्येय असतं. मोदीजीना सांगून राणे साहेब इंडस्ट्री कोकणात आणतील. कोकणचं चित्र बदललेलं असेल. कोविडच्या काळात जगात 3 ते 4 देशांकडे लस होती. मोदीजींनी स्वतः पुढाकार घेऊन देशात लस तयार केली. मोदीजींना आशिर्वाद देण्याची हीच वेळ आहेत. एकीकडे मोदीजी दुसरीकडे नारायण राणेजी हे कोकणच्या विकासाचं कॉम्बिनेशन आहे, असं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
इंडिया आघाडीवर निशाणा
आताची लोकसभेची निवडणूक ही देशाकरिता महत्त्वाची आहे. देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. आपल्यासमोर केवळ 2 पर्याय आहेत. एकीकडे विश्वगौरव नरेंद्र मोदीजी आणि दुसरीकडे राहुल गांधी आहेत… राहुल गांधी .यांच्या नेतृत्वात 26 पक्षांची खिचडी आहे. शरद पवार यांनी आपला जाहीरनामा जाहीर केला आहे. जाहीरनामा राहुल गांधींचा चालणार आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी इंडिया आघाडीवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला.
आपली महायुती मोदीजींचं भक्कम इंजिन आहे. आपली गाडी विकासाची गाडी, आपली गाडी पुढे जातेय. तिकडे प्रत्येकजण म्हणतोय मी इंजिन आहे. तिकडे डबे नाहीत. फक्त इंजिन आहे. उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये आदित्यला जागा आहे. शरद पवारांच्या इंजिनमध्ये सुप्रिया सुळेंना जागा आहे. राहुल गांधींच्या इंजिनमध्ये सोनिया गांधी प्रियांका गांधी यांना जागा आहे आहे. तुम्हाला जागा नाही. कोविडच्या काळात जगात 3 ते 4 देशांकडे लस होती. मोदीजींनी स्वतः पुढाकार घेऊन देशात लस तयार केली. मोदीजींना आशिर्वाद देण्याची हीच वेळ आहेत, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी स्थानिकांना संबोधित केलं आहे.
नरेंद्र मोदींच्या कामाचं कौतुक
तुम्हाला जागा मोदींजींच्या इंजिनमध्ये आहे. त्यासाठी नारायण राणे साहेबांना मतदान करा. पुढच्या टर्ममध्ये 20 लाखांचं बिनव्याजी कर्ज तरुणांना देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला आहे. 2026 नंतर अर्धा मंच महिलांचा असेल. समाजाच्या प्रत्येक घटकाला घेऊन मोदीजी पुढे चालले आहेत. महाराष्ट्रातील सरकार हे नरेंद्र मोदींजीसोबतचं सरकार आहे. हे वसुली सरकार नाही. जगाच्या पाठीवर मोदीजीनी भारताला सन्मानाचं स्थान मिळवून दिलं आहे. आता तो भारत राहिलेला नाही. 2019 नंतर एकतरी बॉम्बस्फोट भारतात झाले का?, असं म्हणत मोदी सरकारच्या काळातील कामांची देवेंद्र फडणवीसांनी उजळणी केली.