राजकरणात ज्यूनिअर आर.आर. पाटलांची एंट्री
राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील (organized)यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन कवठेमंहाकाळ येथे करण्यात आले होते. या शेतकरी मेळाव्यातच शरद पवार यांनी आगामी विधानसभेसाठी युवा नेते रोहित पाटील यांना शक्ती द्या अशी घोषणा केली. सध्या आर आर आबा यांच्या पत्नी सुमन पाटील सांगलीतून आमदार आहेत पण आगामी विधानसभेच्या तोंडावर शरद पवारांनी केलेल्या विधानामुळे रोहित पाटील विधानसभा लढवणार असे चित्र स्पष्ट होताना दिसत आहे.
मागील काही महिने रोहित पाटील यांचा राष्ट्रवादीत सक्रिय सहभाग दिसतोय इतकेच नव्हे तर सांगलीत युवा नेतृत्व म्हणून जिल्हापरिषद आणि ग्रामपंचायत निवडणुकीत रोहित पाटील हिरहिरीने सहभागी झालेले दिसून आले.शरद पवारांनी याच कार्यक्रमाच केंद्र सरकारवर सुद्धा सडकून टीका केली इतकेच नव्हे तर, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात सर्वसामान्य गोरगरीब जनतेसह शेतकरी वर्गाच्या विकासासाठी काहीच काम केले नाही असा थेट आरोप पवारांनी केला. मोदी सरकार हे मुठभर लोकांसाठी आहे
, सर्वसामान्य जनतेसाठी नाही, यामुळे(organized) देशातील गोरगरीब जनता दुखावली आहे असे पवार म्हणाले. देशातील जनतेने परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत परिवर्तन घडणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येणार आहे. असा स्पष्ट विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी व्यक्त केला.
आज पार पडलेल्या कवठेमहांकाळ येथील महांकाली कारखान्याच्या झालेल्या शेतकरी मेळाव्यासाठी राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांच्याकडून मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले होते. तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी दिसून आली. आगामी विधानसभेच्या दृष्टीने या शेतकरी मेळाव्यास मोठे महत्त्व प्राप्त झाले होते. शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या शेतकरी(organized) मेळाव्यात युवा नेते रोहित पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा होणार की काय याकडे सर्वांचे लक्ष होते.
या दृष्टीने महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघासाठी रोहित पाटील यांची उमेदवारी ठरली आहे असा स्पष्ट संकेत पवारांनी दिला आहे.
हेही वाचा :
नदीच्या प्रवाहाशी झुंज! तरुणाच्या शोधार्थ जीवघेण्या 48 तासांची शोधमोहीम
शरद पवारांचे आरोप: सरकारच्या योजना फसव्या आणि लागू होण्याबाबत शंका
सांगली जिल्ह्यातून आषाढी यात्रेसाठी 260 अतिरिक्त बस सेवा!
कोल्हापुर दोन तरण्याबांड मुलांच्या अकाली मृत्यूनंतर आईनं पाचव्या दिवशी अखेरचं श्वास