यंदाचा राम जन्मोत्सव खास, रामनवमीनिमित्त १ लाख ११ हजार १११ किलोंचे लाडू अयोध्येत पाठवणार
संपूर्ण देशभरात रामनवमीचा(ram navami) उत्साह पाहायला मिळत आहे. १७ एप्रिलला संपूर्ण देशभरात रामनवमी साजरी केली जाणार आहे. अयोद्धेत राममंदिरात भक्तीभावात रामनवमी साजरी करण्यात येणार आहे. दरम्यान, रामनवमीसाठी १ लाख ११ हजार १११ किलो लाडू प्रसादासाठी राममंदिरात पाठवण्यात येणार आहे.
रिपोर्टनुसार, राम मंदिरात(ram navami) रामनवमीच्या उत्सवाची तयारी सुरु झाली आहे. याचसाठी देवरा हंस बाबा ट्रस्टच्या वतीने १ लाख ११ हजार ११ लाडूंचा प्रसाद अयोद्धेत पाठवण्यात येणार आहे. याबाबत ट्र्स्टचे अध्यक्ष अतुल कुमार सक्सेना यांनी माहिती दिली आहे.
देवरा हंस बाबा ट्र्स्टच्या वतीने १,११,१११ किलो लाडूंचा प्रसाद अयोध्येत पाठवण्यात येणार आहे. तसंच लाडूचा प्रसाद दर आठवड्याला देशभरातील विविध मंदिरात पाठवला जातो. तिरुपती बालाजी, काशी विश्वनाथ मंदिर, तिरुपती बालाजी अशा सर्व मंदिरात हा प्रसाद दिला जातो. २२ जानेवारीला रामललांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्तदेखील ट्रस्टने ४० किलो लाडू वाटले होते.
यंदाच्या वर्षी भाविकांमध्ये रामनवमीचा खूप जास्त उत्साह पाहायला मिळत आहे. पाचशे वर्षांनंतर अखेर अयोद्धेत राम मंदिर उभारण्यात आले आहे. त्यामुळे यंदाच्या रामनवमीनिमित्त अयोद्धेत भाविकांची दर्शनासाठी गर्दी होणार असल्याचे दिसत आहे. तसेच देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे.
हेही वाचा :
काँग्रेसमध्ये मोठ्या हालचाली, बड्या नेत्यांना तातडीने बोलवले…
कांद्यावरील निर्यातबंदी उठवा, केंद्राच्या कांदा खरेदी याेजनेला शेतक-यांचा विराेध
..अन् मैदानात रोहित शर्माची पॅण्टच सरकली! CSK vs MI सामन्यातील ‘तो’ Video व्हायरल